नवीन नांदेड। श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय सिडको नांदेड येथील विद्यार्थिनींनी १९ वर्षाखालील मुलीच्या गटामध्ये इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय खो – खो संघाने सुवर्णपदक प्राप्त केले. तर १९ वर्षाखालील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला व सदैव क्रीडा स्पर्धेत यश प्राप्त करुन महाविद्यालय यशाची परंपरा कायम राखली.
क्रीडा व युवक सेवा संचलनालय (महाराष्ट्र राज्य ) पुणे. व नांदेड मनपा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकत्याच घेण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय खो- खो क्रीडा स्पर्धेमध्ये १९ वर्षा खालील मुलीच्या गटामध्ये इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय खो- खो संघाने आपली यशाची परंपरा कायम ठेवत सुवर्णपदक पटकाविले व उस्मानाबाद येथे होणाऱ्या विभागीय शालेय खो- खो क्रीडा स्पर्धेमध्ये या संघाची निवड झाली.
खो- खो संघाची कर्णधार कु. वैष्णवी शिवभक्ते, उपकर्णधार सरोज चापोले, स्वाती टोमके, या तीनही खेळाडूचा आपल्या संघाला विजय मिळवून देण्या मध्ये सिंहाचा वाटा उचलला तसेच त्यांना मोलाचे सहकार्य कु. रोहिणी लांडगे, संजीवनी लांडगे, पुनम सोनसळे, सीमा गळाफडे ,प्रीती कांबळे, अंकिता कदम, ज्ञानेश्वरी, आर्या लोणे, पूजा गाडे, आकांक्षा कांबळे, दिपाली शेट्टे, कु.वैष्णवी मागीलवाड, यांच्यासह इत्यादी खेळाडूनी सहकार्य केले.
या यशाबद्दल वरील सर्व खेळाडूचा सत्कार इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. माळी,पर्यवेक्षक प्रा.यू सी.चंदेल ,यांच्या शुभ हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
या यशाबद्दल डॉ.बी.एल.घायाळ,प्रा.संजय शिंदे, प्रा.झकास फासगे , प्रा.स्वाती कोठुळे (संघ व्यवस्थापक ) प्रा.डॉ.संजय देशमुख, प्रा.सातानुरे, प्रा.नितीन दारमोड प्रा.राम कदम, प्रा जोगदंड, श्री.स्वप्निल पाताळे, सतीश कुकुटला, सौ.स्वामी बाई, प्रा.संतोष हापगुंडे, प्रा.शशिकांत हाटकर यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, व अनेक विद्यार्थ्यांनी या यशस्वी खेळाडूचे अभिनंदन केले.या विजेत्या संघाला क्रीडा शिक्षक प्रा.डॉ.रमेश नांदेडकर, विनोद जमदाडे सर, सुर्यवंशी सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.