आर्टिकल

चिकित्सेसाठी विदेशी संगीतापेक्षा भारतीय संगीत अधिक परिणामकारक ! – महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेल्या संशोधनाचा निष्कर्ष

नागपूर| संगीत ही मानवजातीला परमेश्वराकडून मिळालेली एक अनमोल देणगी आहे. संगीताच्या माध्यमातून मनुष्य तणावमुक्त होऊ शकतो. ईश्वराशी एकरूपता अनुभवू शकतो; मात्र सध्या संगीताला अशांती अन् पतन यांचे माध्यम बनवले जात आहे, अशी चिंता जगभरातील समाजशास्त्रज्ञ सातत्याने व्यक्त करत असतात. भारतीय शास्त्रीय संगीत विदेशी संगीताच्या तुलनेत विविध प्रकारच्या व्याधी कमी करण्यासह आध्यात्मिक स्तरावरही परिणामकारक असल्याचे संशोधनातून समोर आले आहे, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विशारद कु. तेजल पात्रीकर यांनी केले. त्या रामटेक (नागपूर) येथील ‘कवीकुलगुरु कालीदास संस्कृत विद्यापीठ’ यांनी आयोजित केलेल्या ‘इंडियन नॉलेज सिस्टीम – फ्यूचर डायमेंशन’ या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ऑनलाईन बोलत होत्या. त्यांनी या परिषदेमध्ये ‘संगीत चिकित्सेमध्ये भारतीय संगीताचे महत्व !’ या विषयावर शोधनिबंध सादर केला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे या शोधनिबंधाचे मार्गदर्शक, तर कु. तेजल पात्रीकर या लेखिका आहेत.

संगीत विशारद कु. तेजल पात्रीकर पुढे म्हणाल्या की, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने उच्च रक्तदाबाचा विकार असणार्‍या व्यक्तींवर भारतीय शास्त्रीय संगीत, देवतांचा नामजप, बीजमंत्र, ॐकार, तसेच विदेशांतील ‘मार्काेनी युनियन’चे ‘वेटलेस’ या संगीताचा काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यात आला. सध्या ‘मार्काेनी युनियन’ हे ताण हलका व्हावा आणि ‘वेटलेस’ हे रक्तदाब कमी होण्यासाठी जगप्रसिद्ध आहेत. या संशोधनात्मक चाचणीसाठी तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उच्च रक्तदाब असलेल्या काही रुग्णांना निवडण्यात आले. संशोधनासाठी ‘युनिर्व्हसल ऑरा स्कॅनर’चा वापरही करण्यात आला.

या प्रयोगात भारतीय संगीतातील ‘राग गोरखकल्याण’ ऐकल्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी सर्वांचा रक्तदाब मोजण्यात आला. त्या वेळी 5 पैकी 4 जणांचा रक्तदाब संगीत ऐकण्‍यापूर्वीच्‍या त्यांच्या रक्तदाबाच्या तुलनेत घटला होता. एकाचा रक्तदाब सामान्य होता. ‘वाढलेल्या रक्तदाबामध्‍ये घट झाली आणि 72 घंटे औषधोपचार न करताही ती टिकली’, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. संगीत ऐकल्यानंतर व्यक्तींची नकारात्मक ऊर्जा सरासरी 60 टक्के घटली आणि त्यांच्या सकारात्मक ऊर्जेत सरासरी 155 टक्के वाढ झाली. असाच परिणाम शास्त्रीय संगीतासह देवतांचा नामजप, बीजमंत्र आणि ॐकार यांच्या ऐकण्याचाही रूग्णांवर झाला.

या संशोधनामध्ये ब्रिटीश बँड ‘मार्कोनी युनियन’चे ‘वेटलेस’ असलेले रिलॅक्स म्युझिकही ऐकवले. या प्रयोगानंतरही दोघांचा रक्तदाब कमी झाला, मात्र दोघांच्या नाडीचे ठोके वाढले. तसेच यू.ए.एस्. यंत्राद्वारे केलेल्या चाचणीत त्यांच्या नकारात्मकतेत सरासरी 53 टक्के वाढ झाली, तर एकाची सकारात्मक प्रभावळ 53 टक्क्यांनी घटली आणि दुसर्‍याची सकारात्मक प्रभावळ पूर्णपणे कमी झाली. यातून असे लक्षात आले की, भारतीय संगीत आणि नाद चिकित्सेतून व्याधी कमी होतातच, त्यासह व्यक्तीची सकारात्मक प्रभावळ ही वाढते. तर विदेशी संगीतामुळे व्याधी जरी कमी होत असली, तरी सकारात्मकता कमी होऊन नकारात्मकतेत वाढ होते. भारतीय संगीत किंवा नाद यांमध्ये मुळातच सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) आहे. याचा परिणाम दुरगामी टिकणारा असतो. भारतीय संगीतामुळे रुग्णांना सकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात मिळत असल्याने त्यांची रोगप्रतिकार क्षमताही वाढते. तसेच कोणता ‘साईड इफेक्ट’ होत नाहीत.

श्री. आशिष सावंत,संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय.(संपर्क : 9561574972)

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!