नवीन नांदेड़। श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र, सिडको, नवीन नांदेड येथील एम एस. डब्ल्यू. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा विशेष भाग म्हणून ग्रामीण समाजकार्य शिबिर घेतले जाते त्याचे उद्घाटन मौजे तुप्पा ता.जी.नांदेड येथे दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
डॉ.नानासाहेब जाधव यांच्या प्रेरणेतून व प्राचार्य डॉ.डब्ल्यू.आर. मुजावर यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी शिबिराच्या उद्घाटन मौजे तुप्पा येथील सरपंच सौ.मंदाकिनी ज्ञानेश्वर यन्नावार या होत्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एन. जी.पाटील हे होते प्रमुख मार्गदर्शक प्रा.एम.ए.कपूर हे होते तसेच तुप्पा येथील ग्रामपंचात आजी-माजी सदस्य ,रवी पंडित ,चिमणाजी कदम के.के. पंडित,सुरज पंडित,सतीश पवार यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली.
यावेळी मार्गदर्शन करताना रवी पंडित यांनी विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील सर्व जाती धर्मांचा,महापुरुषांचा संपूर्ण अभ्यास करावा तरच ग्रामीण भागातील समस्या तुम्हाला समजतील व त्यावर तुम्हाला कार्यकरता येईल असे सांगितले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.मेघराज कपूर यांनी समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी चौकस बुद्धीने व संशोधक दृष्टीने ग्रामीण भागातील लोकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना शोधल्या पाहिजेत तसेच सर्व विद्यार्थ्यांनी गावातील माहिती घेत असताना नम्रपणे घेतली पाहिजे.
शिस्त पाळली पाहिजे असे सांगितले. यानंतर प्रा.डॉ.एन.जी.पाटील यांनी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्रसंगी असे म्हटले की कोणत्याही गावाचा विकास त्या गावातील लोकांच्या सहकार्यातूनच होत असतो, 73 व्या घटनादुरुस्तीमुळे महिलांना ग्रामपंचायत मध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाल्यामुळे स्त्रिया व गावाचा सर्वांगीण विकास होत आहे.
त्यात समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनीहि या शिबिराच्या माध्यमातून ग्रामविकासासाठी हातभार लावावा तसेच स्वतःच्या ज्ञानात व कौशल्यात भर घालावी असे म्हटले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिबिर प्रमुख प्रा.डॉ. व्ही.एस.रेड्डी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.जी.एच. बडगिरे यांनी केले तसेच कार्यक्रमास उपस्थित यांचे आभार प्रा.डॉ.एस.डी. वरगंटे यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच एम.एस.डब्ल्यू.च्या विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग लाभला कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.