नांदेडमनोरंजन

‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या ज्ञानतीर्थ युवक महोत्सवाचे १२ ऑक्टोबर रोजी उद्घाटन

नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ‘ज्ञानतीर्थ’ दि. १२ ते १५ ऑक्टोबर या दरम्यान लातूर येथील दयानंद कला महाविद्यालय येथे संपन्न होणार आहे. या महोत्सवाला उद्घाटक म्हणून प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांची उपस्थिती लाभणार असून, हास्य जत्रा फेम प्रसिद्ध अभिनेते समीर चौघुले यांच्या शुभ हस्ते या समारंभाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे.

दि. १२ ऑक्टोबर रोजी तरुणाईच्या या युवक महोत्सवाचे उद्घाटन स्वराज्य रक्षक संभाजी मालिका फेम प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले हे राहणार आहेत. याप्रसंगी प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी असून विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी यांची उपस्थिती लाभणार आहे. या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाची सुरुवात १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ७:३० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊन हॉल) येथून शोभायात्रेने होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन दयानंद शिक्षण संस्थेच्या प्रांगणात उभारलेल्या मुख्य सभा मंडपात सकाळी ११:०० वा. होणार असून, त्यानंतर लगेच समांतर पणे राजर्षी छत्रपती शाहू महाराज (मुख्य कला मंच), डॉ. श्रीराम लागू (नाट्यमंच ), पंडित कुमार गंधर्व (स्वर मंच), लोकनेते विलासराव देशमुख मंच आणि राजा रवी वर्मा (कला मंच) या पाचही मंचावर एकूण ३० कला प्रकारांचे सादरीकरण होणार आहे.

तरुणाईच्या या महोत्सवात यावर्षी बहुसंख्य महाविद्यालयांनी सहभाग घेतला असून यामध्ये मुलींची संख्या लक्षणीय आहे. या महोत्सवातील एकूण ३० कला प्रकारांचे सादरीकरण करण्यासाठी लॉट्स पद्धतीचा अवलंब करण्यात आला असून, लॉटस पद्धतीने कॉलेज कोड क्रमांकानुसार विविध कला प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. विद्यापीठ परिक्षेत्रातील युवा कलावंतांच्या महोत्सवासाठी दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून, विद्यार्थी कलावंतांच्या स्वागतासाठी दयानंद कला महाविद्यालय सज्ज झाले आहे. युवक महोत्सवाच्या रूपाने होणारा विविध रंगी कलाविष्कार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व रसिकांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे.

युवक महोत्सवामध्ये ‘मराठवाडा मुक्ती संग्राम:लढा स्वातंत्र्याचा गाथा बलिदानाची’ हा विषय शोभायात्रेसाठी ठेवण्यात आला आहे. शोभा यात्रेमध्ये सर्व सहभागी महाविद्यालयांनी सहभागी होणे आवश्यक असून, सकाळी ७:३० वा. आपला संघ घेऊन त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊन हॉल) लातूर येथे उपस्थित रहावे. ‘एक देश एक निवडणूक हे धोरण योग्य/अयोग्य’ या विषयावर वादविवाद स्पर्धा संपन्न होणार आहे. तसेच या महोत्सवात वक्तृत्व स्पर्धेसाठी १) लोकराजा राजर्षी शाहू महाराज, २) महाराष्ट्राचा रहाटगाडा पुढे नेतो मराठवाडा, ३) राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, ४) आत्मनिर्भर भारत हे विषय ठेवण्यात आलेले आहेत.

तसेच संगीतकला, ललित कला, वांग्मय कला, लोकनृत्य व आदिवासी नृत्य, शास्त्रीय नृत्य, नाटक, एकांकिका, नक्कल, प्रबोधनात्मक जलसा इत्यादी कला प्रकाराचे या महोत्सवात विविध मंचावरून सादरीकरण होणार आहे.

ज्ञानतीर्थ या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठ आणि आयोजक महाविद्यालयाकडून विविध समित्यांची स्थापना केली असून हा महोत्सव उत्साहात व शिस्तीत पार पडण्यासाठी विद्यार्थी, कलावंत व संघव्यवस्थापकांनी सहकार्य करावे, असे आवाहन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव आणि दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी केले आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!