नवीन नांदेड। नांदेड तालुक्यातील नागापूर ग्रामपंचायत साठी तब्बल ३० वर्षा नंतर झालेल्या निवडणुकीत शिवस्वराज पॅनलचे थेट जनतेतून सरपंच पदासाठी दत्तात्रेय करडिले यांच्या सह चार ग्रामपंचायत सदस्य निवडून आले तर विरोधी शिवछत्रपती नवयुवक एकता पॅनलला केवळ तीन जागा मिळाल्या, यात एक जागा बिनविरोध निवड झाली आहे,काल दि. ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत ९१ टक्के मतदान झाले होते तर ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली.
नांदेड तालुक्यातील व ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या नागापूर ग्रामपंचायत साठी तब्बल तिस वर्षा नंतर प्रथमच निवडून झाली, या आगोदर बिनविरोध निवडणूक झाली. यावेळेस प्रथमच सात जागेसाठी पंचवार्षिक निवडणूक झाली यात निवडणूक पुर्व एक जागा बिनविरोध निवडून आली सहा ग्रामपंचायत जागेसाठी व शिवस्वराज ग्रामविकास एकता पॅनल यांच्या कडून थेट जनतेतून सरपंच पदासाठी दत्तात्रय रघुनाथ पाटील करडीले व अन्य सहा उमेदवार विजयी झाले तर शिवछत्रपती नवयुवक एकता ग्रामविकास पॅनलचा वतीने थेट जनतेतून सरपंच पदासाठी बालाजी सपुरे व सहा उमेदवार अशी अटतीची लढत झाली.
यात आकरा मतांनी सरपंच पदासाठी दत्तात्रय करडीले २४२ मतांनी विजयी झाले तर एक जागा निवडणूक पुर्वी सुर्यकांत गजभारे बिनविरोध निवडून आले, उर्वरित सहा ग्रामपंचायत सदस्यासाठी ५ नोव्हेंबर रोजी निवडणूक झाली एकुण ५२७ मतदारांपैकी ४८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला व ९१ टक्के मतदान झाले, ६ नोव्हेंबर रोजी नांदेड तहसील येथे मतमोजणी झाली.
निवडणूक निकाल मध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून शिवस्वराज ग्रामविकास पॅनलचे रामचंद्र नागोबा पाटील करडीले, गणेश गुंडाजी पाटील मस्के, वैभव भाऊराव पाटील मस्के,आंनदा कचरु पाटील करडीले, तर शिवछत्रपती नवयुवक एकता ग्रामविकास पॅनलचे सचिन संभाजी सपुरे,सारिका ज्ञानेश्वर करडीले हे सहा ग्रामपंचायत सदस्य निवडून आले.
विजयी झाल्या नंतर पॅनल प्रमुख दिंगाबर रघुनाथ पाटील करडीले व थेट जनतेतून निवडणून आलेले दत्तात्रय रघुनाथ पाटील करडीले व ग्रामपंचायत सदस्य यांच्ये ग्रामस्थ नागापूर व समर्थक यांच्या वतीने भव्य दिव्य स्वागत करून गुलाल उधळून व पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले, यावेळी माधव मस्के,गजानन पाटील मस्के,दिलीप मस्के,शामराव करडीले,सदाशिव करडीले, भाऊराव मस्के, माजी सरपंच व्यंकटी पाचांळ, पुरभाजी करडीले,साईनाथ करडीले,माधव करडीले,जनार्दन करडीले यांनी निवडणून आणण्यासाठी परिश्रम घेतले.
नांदेड तालुका क्राॅग्रेस अध्यक्ष तथा जिल्हा परिषद माजी सदस्य मनोहर पाटील शिंदे,शिवसेना शिंदे गटाचे नांदेड जिल्हाप्रमुख आंनद पाटील बोढारकर, तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे,सिडको शहर प्रमुख सुहास पाटील खराणे यांनी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सत्कार करून अभिनंदन केले, निकाला नंतर गावात ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी श्रीधर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.