नांदेडलाईफस्टाईल

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गत 24 तासात 165 रुग्ण बरे होऊन परतले घरी

नांदेड। येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात एकुण 857 रुग्णांनी ओपीडीमध्ये उपचार घेतला. सद्यस्थितीत 726 रुग्ण रुग्णालयामध्ये भरती आहेत. मागील 24 तासात म्हणजेच दि. 5 ऑक्टोंबर ते 6 ऑक्टोंबरच्या मध्यरात्रीपर्यंत एकुण 184 नवीन रुग्णांची भरती झालेली आहे.

या 24 तासात 165 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या कालावधीत 6 अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 1 नवजात बालक (स्त्री जातीचे ) व बालक 1 (पुरुष जातीचे) व प्रौढ 4 (पुरुष जातीचे 2, स्त्री जातीचे 2) यांचा समावेश आहे.

वर नमूद 24 तासात एकूण 63 शस्त्रक्रिया झाल्या. यात 42 रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया तर 21 रुग्णांवर लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मागील 24 तासात 23 प्रसुती करण्यात आल्या. यात 6 सीझर होत्या तर 17 नॉर्मल प्रसुती झाल्या अशी माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ. गणेश मनुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!