करियरनांदेड

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारमध्ये येवली येथील ग्रामपंचायतकडून स्नेहीत पेन्शनवार परिवाराचा पुरस्कार देऊन सन्मान

हिमायतनगर। येथील व्यापारी संजय पेन्शनवार यांचे चिरंजिव स्नेहींत पेन्शनवर याने सण २०२३ मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील भोकर,हदगाव, हिमायतनगर या तिन्ही तालुक्यातून NEET परीक्षेत प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. सध्या स्नेहित पेन्शनवर KEM हॉस्पिटल मुंबई येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे.

वैद्यकीय क्षेत्रात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन हदगाव तालुक्यातील येवली येथील श्री रामधन राठोड सर (नांदेड येथील स्किन स्पेशालिस्ट डॉ .राठोड यांचे वडील) यांनी भोकर,हदगाव, हिमायतनगर या तिन्ही तालुक्यातून NEET परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थाला पुरस्कार जाहीर केला होता. त्यामध्ये “स्नेहीत संजय पेन्शनवार” हा पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.

21 हजार रुपयाचा धनादेश व सन्मान चिन्ह देऊन ग्राम पंचायत येवली ता. हदगाव यांच्या मार्फत पेन्शनवार कुटुंबातील सदस्य सौ. वैशाली संजय पेन्शनवार या दाम्पत्याचा स्वागत करून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. स्नेहीतने मिळविलेल्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात असून, विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीने अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळेल अख्या शब्दात इतर विद्यार्थ्यांनी स्नेहीतचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण घ्यावे असे आवाहन या करण्यात आले आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!