हदगाव, शे.चांदपाशा| राज्य सरकारने दिनांक 20 फेब्रुवारी 2024 च्या मराठा आरक्षणा बाबत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवले आहे. या अधिवेशनात हदगाव विधानसभा क्षेत्राचे आ. माधवराव पा. जवळगावकर यांनी मराठा आरक्षणा करिता विधानसभा सभागृहात विशेष आवाज उठवावा अशी मागणी मराठा सेवक दत्ता पाटील हडसणीकर यांनी केली आहे.
यातही दत्ता पाटील हडसणीकर हे दि. 16 फेब्रुवारी ला सकाळी १० वाजे पासून एक दिवशीय आमरण उपोषणास बसले आहेत. हदगाव शहरातील डोंगरगाव रोड येथे विद्यमान आमदार माधवराव पाटील यांच्या घरा समोर जनसंपर्क कार्यालय परिसरात उपोषणास बसलेले आहेत. या पूर्वी दत्ता पाटील हडसणीकर हे मराठा आरक्षणा करिता हदगाव ते मुंबई पायी गेले होते.
त्यानंतर आझाद मैदानावर 42 दिवस उपोषणास बसले होते…! त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून आपण सर्व मिळून मराठा समाजसशी काम करून आरक्षण मिळून देऊ असे आश्वासन दिले होते. आता या आश्वासनाची पूर्तता व्हावी यासाठी सर्व माराही समाजाच्या आमदारांनी देखील आपली बाबूमिक मांडणे आवश्यक असल्याने त्यांनी उपोषण केले आहे.