नांदेड| तालुक्यात दिनांक 30 नोव्हेंबर पासून ते 19 डिसेंबर 23 पर्यंत मोहीम म स्वरूपात शिबिराचे आयोजन करण्यात सुरुवात केली. तालुक्यातील भाकड व वंदेत्व पशुंवर उपचार करून ते उत्पादनात आणण्यासाठी नांदेड तालुक्यात 30 नोव्हेंबर पासून पशु वंध्यत्व निवारण शिबिरे घेण्यात येणार आहेत आज नांदेड तालुक्यातील जैतापूर,गुंडेगाव,वाणेगाव, विष्णुपुरी या गावांमध्ये पशु वंध्यत्व शिबिर संपन्न झाले.
भाकड व वंदत्व जनावरांना उत्पादनात आणण्यासाठी वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना शासनाच्या वतीने देण्यात आल्या होत्या त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून व पंचायत समिती नांदेड कडून दिनांक 30 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीत तालुक्यातील प्रत्येक पशुवैद्यक दवाखाना जिल्हा सर्व चिकित्सालय यांच्या कार्यक्षेत्रात पशु वंदेत्व निवारण शिबिराची मोहीम स्वरूपात आयोजन करून आजपासून सुरू करण्यात आले.
सदर शिबिरात वंद्यत्व निवारण केलेले जनावरे 48, गर्भ तपासणी केलेले जनावरे 20, कृत्रिम रेतन केलेली जनावरे 4, जंतनाशक औषधी पाजवलेले जनावरे 120, आज एकूण 192 जनावरांवर उपचार करण्यात आले. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी गावकऱ्यांनी परिश्रम घेतले. सदर शिबिरात तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. अविनाश बुन्नावार, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीण कुमार घुले, डॉ. उपेंद्र गायकवाड, डॉ. दीप्ती चव्हाण, पशुधन पर्यवेक्षक गजानन मठपती,विनायक पल्लेवाड, सविता सोनटक्के, व पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी वर्ग शेख मकसूद, माळवतकर, जमदाडे,कदम, अनिल वार्ताळे व गावातील बहुसंख्य पशुपालकांची उपस्थिती होती. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी तालुका पशुधन विकास अधिकारी विस्तार डॉक्टर अविनाश बुन्नावार व त्यांचे सहकारी यांनी परिश्रम घेतले