नांदेड| मराठवाड्यामध्ये ऊस उत्पादक शेतकर्यांना पूर्णा सहकारी साखर कारखान्याने 2803 रूपये प्रतिटन भाव दिला आहे. इतर कारखान्याच्या तुलनेत पुर्णा सहकारी साखर कारखान्याने ऊसाला चांगला भाव दिला आहे. ही बाब लक्षात घेता शेतकर्यांनी पूर्णा सहकारी साखर कारखान्याला ऊस द्यावा, इतर कारखान्याला ऊस देऊन स्वतःची गैरसोय करून घेऊ नये, असे प्रतिपादन अखिल भारतीय साखर संघाचे अध्यक्ष तथा पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले.
पूर्णा सहकारी साखर कारखाना लि. वसमतनगर ऊस उत्पादक शेतकर्यांचा मेळावा श्रीक्षेत्र गोपाळचावडी येथे दि. 23 ऑक्टोबर रोजी आयोजित केला होता. प्रारंभी गोपाळचावडी येथील श्रीकृष्ण मंदिरात दर्शन पूर्णा कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आणि पुर्णा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. सुनील कदम आणि संचालक मंडळाने घेतले. तसेच ऊस तोडणीच्या दोन हार्वेस्टर मशीनचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर आयोजित शेतकरी मेळाव्यात दांंडेगावकर बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय साखर महासंघाचे अध्यक्ष तथा पूर्णा कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, प्रमुख पाहुणे म्हणून पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. सुनील कदम, शेती समितीचे अध्यक्ष शहाजीराव देसाई, संचालक बबनराव बेंडे, संचालक नितीन जाधव महागावकर, संचालक गजानन धवन, श्रीधरराव पारवे, ज्ञानोबा वंजे, तुकाराम चव्हाण, कार्यकारी संचालक सुनील दळवी, मुख्य शेतकी अधिकारी प्रद्युम देशपांडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय कदम, डॉ. संजय कदम, नारायणराव क्षीरसागर, केशवराव बोकारे, रंगनाथराव वाघ, प्रकाश पोकळे, गंगाधरराव धवन, शिवाजी सौराते, नरहरी वाघ, बालाजी सुर्यवंशी, चंपतराव सुर्यवंशी, विश्वनाथराव धुमाळ, मधुकरराव पाटील, सत्यजीत भोसले, रतनराव सुर्यवंशी, पंजाबराव सुर्यवंशी, काशीनाथराव बोकारे, प्रसाद चापके, गोपीनथ बोकारे, शंकरराव बोकारे, बंटी लांडगे, गणेश तादलापूरकर, राहुल जाधव, गजानन वाघ, धनंजय सुर्यवंशी यांच्यासह आदी जणांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना दांडेगावकर म्हणाले की, अनेक कारखान्यांना आपल्या भागातील ऊस उत्पादकांनी इतर कारखान्याला ऊस दिला, परंतु अद्यापही अनेक शेतकर्यांना त्या ऊसाची रक्कम मिळाली नाही. मागील 40 वर्षांपासून पूर्णा कारखान्याचे बॉयलर पेटले आहे. राज्यातील इतर कारखान्याप्रमाणे सर्वाधिक ऊसाला भाव पूर्णेने दिला आहे. त्यामुळे आपला ऊस पूर्णा कारखान्याला द्यावा, प्रत्येक गावामध्ये ऊस उत्पादक सभासद शेतकर्यांना साखर उपलब्ध करून दिली जाणार आहे. केंद्र सरकार ऊस उत्पादक शेतकर्यांच्याविरोधात भुमिका घेत असल्याचे त्यांनी सांगितले. 150 दिवस कारखाना सुरू राहील. ऊसाचा एकही टिपरू शिल्लक राहणार नाही. यासाठी आम्ही तत्पर आहोत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी रामदास कोडींबा डाखोरे रा. ढोकी ता. नांदेड, विठ्ठल बळीराम भोजने रा. यकदरा ता. नांदेड या दोघांच्या हार्वेस्टर मशीनचे लोकार्पण करण्यात आले. सुभाषराव कदम, संजयराव कदम, भीमराव कदम, वामनराव कदम, धोडींबा भालेराव, गोपाळराव कदम, प्रतापराव कदम, तानाजी भालेराव, प्रकाश कदम, विश्वास कदम, अनिल कदम, भास्कर कदम, डॉ. दत्तात्रय कदम, दिगंबरराव पोपळे, बापूराव कदम, किशन कदम, सतिश कदम यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी उत्पादक व नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहाजीराव देसाई तर सुत्रसंचलन प्रशांत कदम तर आभार प्रदर्शन बाजार समितीचे संचालक नाना पोहरे यांनी केले.
शेतकर्यांच्या विश्वासास पात्र राहू -डॉ. सुनील कदम
पूर्णा सहकारी कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीत मला निवडून दिले आहे. कारखान्याच्या मालमत्तेचे हित तसेच ऊस उत्पादक शेतकर्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच विश्वासात पात्र राहून काम करणार आहे, असे पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांनी सांगितले. तसेच अनेक पिढ्यांपासून श्रीकृष्ण मंदिर गोपाळचावडी येथे कदम कुटूंबियांकडून प्रसादाचे नवमीच्या दिवशी आयोजन केले जाते. ऊस उत्पादक मेळावा आणि हा नवमीचा दिवस आमच्यासाठी आनंदाचा असल्याचे त्यांनी सांगितले. हार्वेस्टरमुळे ऊस तोडणी अधिक गतीने होणार असल्याचेही डॉ. कदम यांनी सांगितले.