नांदेड| पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान बनविण्यासाठी आणि देशातील शेवटच्या घटकाचा सर्वांगीण विकास घडूवून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रात स्थापन करण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू असून कंधार लोहा मतदार संघात आज जिल्हाध्यक्ष डॉ. संतूकराव हंबर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत 100 वॉरियर्स ची बैठक पार पडली.
या बैठकीला संघटनमंत्री संजयजी कौडगे प्रदेश सचिव देवीदास राठोड भाजपा नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ संतुकराव हंबर्डे साहेब प्रनिताताई देवरे, विधानसभा प्रमुख प्रविण पाटील चिखलीकर, सरचिटणीस डॉ माधवराव पाटील उच्चेकर, लक्ष्मणराव ठक्करवाड, माणिकराव लोहगावे उपाध्यक्ष भगवानराव राठोड, कंधार तालुका अध्यक्ष किशनराव डफडे सर, लोहा तालुका अध्यक्ष आनंदराव पाटील शिंदे, बाबुराव केंद्रे, तुकाराम वारकड, कृषी उत्पन्न बाजार समिती चे कंधार चे सभापती देशमुख, गंगाप्रसाद येन्नावर लोकसभा विस्तारक, व 100 वारीयर्स व पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
आगामी काळातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीतील बूथ कमिटी पर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यांनी जोरदार कामाला लागावे. येणारा काळही भारतीय जनता पार्टीचा असल्याने कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी आणि देशात पुन्हा एकदा भाजपाचे सरकार स्थापन होण्यासाठी काम करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळातील नऊ वर्षात झालेल्या विविध विकासाची कामे , केंद्र सरकारने घेतलेले अनेक महत्त्वपूर्ण निर्णय महत्त्वपूर्ण निर्णय प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचविण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काम करावे. जनतेचा विश्वास संपादन करावा. असे आवाहन जिल्हाध्यक्ष डॉ . संतुकराव हंबर्डे यांनी यावेळी केले.