सिडको हडको परिसरात गेल्या आठ दिवसापासून पाण्याचा ठणठणात, टॅंकरने तात्काळ पाणी पुरवठा करा
नवीन नांदेड l नावामनपा हद्दीत असलेल्या सिडको हडको परिसरात गेल्या आठ दिवसा पासुन मालमत्ता धारकांना करण्यात येणारा पाणी पुरवठा तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याने पाणी पुरवठा विभागात संबंधित अधिकारी उपलब्ध नसल्याने महिला पुरुष, युवक यांना पाण्यासाठी हातपंपाचा शोध घ्यावा लगत असुन तात्काळ टॅंकरने तात्काळ पाणी पुरवठा चालू करावा अशी मागणी माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे व माजी नगरसेविका प्रतिनिधी संजय पाटील घोगरे यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे, मागणी दखल घेत तात्काळ दोन टॅकरने पाणी पुरवठा प्रशासनाने चालू केला आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत विष्णुपूरी जलाशयातून काळेश्वर येथुन सिडको जलकुंभ येथे दैनंदिन पाणी पुरवठा होत असता, संबधित विष्णूपूरी गावात केद्रीय महामार्ग रस्ता काम चालू असल्याने रस्ता खोदलेल्याने पाणी पुरवठा करणारी लाईन गेल्या अनेक दिवसांपासून लिकेज झाल्यामुळे परिसराला होणारा पाणी पुरवठा हा गेल्या आठ दिवसापासून बंद झाला, परिणामी सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत होणारा पाणीपुरवठा बंद असल्याने सार्वजनिक हातपंप व खाजगी बोअर वर मोठया प्रमाणात पाणी आणण्या साठी गर्दी झाली, पाणी पुरवठा विभागाला मात्र पाणी बाबत काही देणे घेणे नसल्याचे दिसून आले.
नव्याने आलेल्या अधिकारी हे तर जबाबदारी आहे का नाही हे गांभीर्याने घेत नसुन ना टॅकर उपलब्ध केले नाही, अखेर संतप्त नागरिकांनी माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्याशी संपर्क साधून तातडीन टॅकर उपलब्ध करून देण्याची मागणी केली, यानंतर तात्काळ अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, पाणी पुरवठा अभियंता सोनसळे,कनिष्ठ अभियंता सरपते ,यांच्याशी संपर्क साधून तातडीने टॅकर उपलब्ध करून देण्याची मागणी करून पाणी पुरवठा लाईन सुरळीत करण्याची मागणी केली आहे. पाणी पुरवठा विभागाला सक्षम अधिकारी व दैनंदिन उपलब्ध असलेले अधिकारी नेमुन पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे , माजी नगरसेविका प्रतिनिधी संजय पाटील घोगरे,यांनी केली आहे. प्रशासनाने मागणी घेत तात्काळ दोन टॅकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.