नवीन नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशन प्रांगणात गेल्या अनेक वर्षांपासून रखडत असलेल्या प्रांगणात खड्डामेय, व रखडलेल्या अनेक जप्त केलेल्या वस्तू अस्तव्यस्त अवस्थेतील प्रांगणात पडलेल्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांनी स्वखर्चाने व सहकार्याने रोडरोलर, पाण्याचे टँकर, आणुन ग्रामीण पोलीस स्टेशन कार्यरत अमलदार, होमगार्ड यांच्या साहाय्याने कायापालट केला असुन काही दिवसात असलेल्या वृक्षाची सजावट करण्यात येणार आहेत.
ग्रामीण पोलीस स्टेशन २००८ मध्ये नवीन ईमारत मध्ये कार्यरत झाल्या नंतर मोठ्या प्रमाणात असलेल्या जागेचा प्रांगणात मोठया प्रमाणात अपघातील वाहने,चोरीस गेलेली दुचाकी,व अन्य गुन्हायातील वाहने व जप्त केलेली साहित्य इतरत्र पसरली गेली तर मोठया प्रमाणात वृक्ष ही वाढलेल्या अवस्थेत असल्याने दैनंदिन पाने व वृक्षाची फांदी तुटत असल्याने मोठया प्रमाणात केरकचरा होत गेला.
ईमारत भाग दिसत नसल्याने वरीष्ठ अधिकारी यांना या बाबत माहिती देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांनी स्वखर्चाने व सहकार्य घेऊन हा निर्णय घेत,प्रथमत प्रांगणात असलेल्या वृक्ष यांच्या फांदी तोडून व वृक्षाची योग्य ती सजावट केली व काही भागात नव्याने झाडे लावून आकर्षक सजावट केली आहे,प्रांगण मध्ये मुरूम टाकून रोडरोलर सहाय्याने मुरूम टाकून दबाई केली व प्रांगणात सुव्यवस्थित केली आहे,या कामी पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे,अंमलदार संतोष जाधव चंद्रकांत स्वामी ,एस.एच.बेलुरोड, बडे,होमगार्ड अब्दुल मुखीद ,रोड रोलर चालक मांगीलाल,यांनी सहकार्य केले.
या कामी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नाईक, यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी सहकार्य केल्याने प्रांगणासह ग्रामीण पोलीस स्टेशन कायापालट झाला असून काही दिवसांत प्रांगण मध्ये वृक्षारोपण ही करण्याचा मनोदय व्यक्त केला असून चिकाटी,जिघ्द,व स्वभामुळे हे काम केले असल्याचे सांगून माहुर पोलीस स्टेशन प्रांगणात ही कायापालट केला असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप यांनी सांगितले.