हिमायतनगर | हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे मंगरुळ येथे सात दिवसीय विशेष निवासी शिबिराचे आयोजन रविवार दि. 11 फेब्रुवारी ते शनिवार दि. 17 फेब्रुवारी 2024 यादरम्यान आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचा चौथा दिवस मंगळवार दि. 14 फेब्रुवारी रोजी शिबिरामध्ये सकाळी दैनंदिन दिनचर्याच्या नंतर योगासने प्राणायामानंतर सकाळी 8:00 वाजता रॅली काढून रक्तदान करण्याविषयी गावकऱ्याचे जनजागरण करून रक्तदानासाठी शिबिरात येण्यासाठी चे आवाहन विध्यार्थ्यांनी केले. आणि तद्नंतर 09 ते 11 तब्बल दोन तास शिबिरार्थ्यानी श्रमदान केले.
सकाळी 11 ते दुपारी 02 वाजेपर्यंत 25 रक्तदात्यानी रक्तदान केले. यासाठी डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय शासकीय महाविद्यालय, नांदेड येथील शासकीय रक्तपेढी डॉ. पवार साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहकार्यातून रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. या प्रसंगी डॉ. पवार साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या शिबिरासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे तथा सहकार्यक्र अमाधिकारी डॉ. एल. बी. डोंगरे यांनी केले. या रक्तदान शिबीराला सहकार्य करण्यार्या प्राध्यापक महिला प्रतिनिधी डॉ. शेख शहेनाज व प्रा. वसुंधरा तोटावाड यांचे विशेष सहकार्य लाभले सदरील रक्तदान शिबीराला महाविद्यालयाचे प्राध्यापक एम. पी. गुडाळे, प्रा. मुकेश यादव, प्रा. डॉ . संघपाल इंगळे, प्रा. राजू बोंबले, प्रा. मिथिलेश शेरकर, कार्यालयीन कर्मचारी श्री साहेबराव असळकर, श्री बालाजी चंदापुरे, राहुल भरणे. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक अथर्व गुंडाळे, रोहित पुरनाळे, विशाल तुंगेवाड, रोशन राठोड, रितेश गाडगे, शिवा ताडकुले, स्वराज लुम्दे, तसेच माजी विद्यार्थी सुरज वाघमारे, पोशठ्ठी जाधव आदिंसह मंगरुळ येथील तरुण सचिन पावडे, जललवाड चांदराव, अनिल सादलवाड, रामकिशन गुर्लेवाड, रामा कुंजरवाड तसेच जि. प. प्रा. शाळेचे सहशिक्षक श्रीनिवास उपलंचवार, सचिन पोपलवार आदींनी रक्तदान केले. सदरील शिबिराला यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी व सहकार्यक्रम अधिकारी तसेच स्वयंसेवक विद्यार्थी व विद्यार्थिनी खूप मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.
यादिवशी दुपारच्या सत्रात अर्धापूर येथून आलेले मराठी विभागाचे प्रमुख प्रो. व.ना. वाघमारे यांनी राष्ट्रभरणीत महापुरुषांची योगदान या विषयावर छ्त्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे अशा सर्वच परिवर्तन या महापुरुषांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. यानंतर रमाई च्या जीवनावर आधारित गीत रोशनी पाईकराव यांनी गायले. तर वैष्णवी सूर्यवंशी हिने सुध्दा एक गीत सादर केले. आणि विशाल तुंगेवाड, शुभम दुगमवाड, रोशन राठोड यांनी पथनाट्य सादर करून अंधश्रद्धेवर प्रकाश टाकला. या रक्तदान शिबिराचे सूत्रसंचालन वैष्णवी सूर्यवंशी यांनी केले तर आभार गायत्री सूर्यवंशी यांनी मानले. सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.