कंधार, सचिन मोरे। मराठी वृत्तपत्रसृष्टीचे पत्रकारितेचे ‘जनक’ दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दि. ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले नियतकालिके सुरू करून मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली होती.त्यांचे स्मरणात आजचा हा दिवस सर्वत्र ‘दर्पण दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून दि.७ जानेवारी २०२४ रोजी मराठी पत्रकारितेचे जनक ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त कंधार पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकारांचा सन्मान करण्यात आला,
जे पत्रकार बांधव स्वतः आपल्या परिवारची चिंता ना करत कठीण परिस्थितीत आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींचा आरसा ठरून सामाजिक. आर्थिक,राजकीय, धार्मिक बांधिलकी जोपसतो अशा पत्रकार बांधवांना दर्पण दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा व सन्मान सोहळा कंधार पोलीस स्टेशनच्या वतिने पत्रकार दिनाचे व दर्पण दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील सर्व दैनिकांच्या पत्रकारांना बोलावून यथोचित सन्मान दि.०७ जाने २०२४ रोज रविवारी ठिक १:३० वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कंधार पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष प्रभारी पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांनी पत्रकार बांधवांना फेटा,दस्ती,डायरी व पेन भेट देऊन यथोचित सन्मान केला, यावेळी पोलीस उपनिरीक्षक इंद्राळे,पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानोबा गिरे,देविदास गीते,संदीप चिंचोरे,पोलीस हवालदार तुकाराम जुने,पोलीस नाईक प्रकाश टाकरस,पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष काळे, शिवाजी सानप, बापुराव व्यवहारे, माधव धुलगुंडे इत्यादी पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार रमेश सिंह ठाकुर,दै.लोकमतचे मारोती चिलपिपरी, दै.प्रजावाणीचे सचिन मोरे,दै.गोदातीरचे प्रल्हाद आगबोटे,हिंदवी बाणाची माधव भालेराव,दै.वतनवालाचे मोहम्मद सिकंदर, दै.बहुरंगी वार्ताचे राजेश्वर कांबळे, दै. लोकनेताचे धोंडीबा मुंडे,दै चालू वार्ता माधव गोटमवाड, महाराष्ट्र लाईव्ह चे मयुर कांबळे, दै.जनतेचे मत शादुल शेख, लोकमत ग्रामीण प्रतिनिधी शंकर तेलंग,दै.आनंदनगरीचे सिद्धार्थ वाघमारे,लोकमत समाचार चे जमीर बेग दै.समीक्षाचे एस.पी केंद्रे,यांची उपस्थिती होती,यावेळी संगमवाडीचे बी.आर घुगे यांनी सर्व पत्रकार बांधवांना मोफत फेटा बांधून बहुमोल सहकार्य केले.