हिमायतनगर। तालुक्यातील ग्रामीण भागात देशी-विदेशी दारू विक्रीचा गोरखधंदा करणाऱ्यांची तक्रार देऊन अवैद्य दारू विक्री थांबून आमचे उघड्यावर येणारे संसार वाचवा अशी मागणी केल्यावरून हिमायतनगर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन आज दि.17 जून रोजी हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम, इंदिरानगर आबादि येथे एका किराणा दुकानावर छापा टाकून देशी विदेशी दारूचा मोठा साठा जप्त करून पोलिसांनी धडाकेबाज कार्यवाही केली आहे. पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीचे महिलांनी अभिनंदन करून गावातील अन्य विक्रेत्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.
याबाबत सवसितर वृत्त असे कि, हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील गावागावात मोठ्या प्रमाणात अवैद्य देशी – विदेशी दारूसह आता नशिली शिंदीची केली जात आहे. याबाबत अनेक गावातून महिला मंडळींसह व्यसनमुक्तीचे प्रचारकांच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. नुकतेच हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु.येथील महिला मंडळींनी हिमायतनगर पोलीस ठाण्यात तक्रार करून विना परवाना कोणतेही दारू विक्रीचे लायसन्स नसताना देशी व विदेशी दारू, किराणा दुकान, पानपट्टी आदींसह अन्य व्यवसायाच्या असून हा अवैद्य दारू विक्रीचा गोरखधंदा चालविला जात आहे. हि बाब महिलांनी हिमायनगर पोलिसांना तक्रार देऊन सांगितली. या दारूमुळे आमचे संसार देशोधडीला लागत आहेत.. युवा पिढी व्यसनाधीन होऊन दारूच्या आहारी गेली आहेत, यवत तात्काळ अंकुश लावून गावात विक्री करणाऱ्या आठ ते दहा विक्रेत्यांवर कार्यवाही करून आमचे संसार वाचावा अशी मागणी केली होती.
त्या मागणीला गांभीर्याने घेत पोलीस निरीक्षक शरद जऱ्हाड यांनी माहिती घेतली, महिला शक्तीने दिलेल्या गुप्त माहितीवरून आज सकाळी पोलिसांनी सरसम इंदिरानगर आबादी येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे असलेल्या किरण बाबुराव कांबळे यांनी टिन शेड, संडास मध्ये लपून ठेवलेल्या ठिकाणी छापा टाकून मोठा देशी विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. यामध्ये पोलिसांनी देशी दारू भिंगरी ११ हजार ६२० रुपये, मैक्डोवेल ११ हजार २५० रुपये, आय बी ४ हजार ६२० रुपये, आर एस २ हजार ७०० रुपये असा एकूण ३० हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हि कार्यवाही पोलीस जमादार अशोक सिंगणवाड, जमादार सुधाकर कदम, प्रकाश गायकवाड, महिला होमगार्ड भुरके व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. या कार्यवाही नांतर अवैद्य दारू विक्रेत्याच्या खळबळ उडाली असून, कार्यवाहीच्या भीतीने अनेकांनी गाशा गुंडाळला आहे. असे असले तरी दोन बंद राहून पुन्हा वैद्य दारू विक्रीचा धंदा सुरु होऊ नये यासाठी गावातील सर्व दारू किक्रेत्यावर कार्यवाही करून पोलिसांनी आपला दबदबा कायम ठेवावा अशी मागणी महिलांनी केली आहे. याबाबत अशोक सिंगणवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध कलम 65 ई महाराष्ट्र प्रॉव्हिशन कायद्यानुसार विनापरवाना अवैद्य रित्या विक्री करण्याच्या उद्देशाने देशी विदेशी दारू साठा बाळगल्या प्रकरणी किरण कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध दारूच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या सरसम येथील रणरागिणी महिलांनी सांगितले की, हा सर्व प्रकार गावातील पोलीस पाटील यांच्याशी मिलीभगत नुसार आठ ते दहा जण करत आहेत. अनेक जण किराणा दुकान, पान टपरी यासह अन्य दुकानाच्या आडून हा गोरख धंदा करत असून मोठ्या बियर बार मध्ये नसलेले सुविधा या ठिकाणी दारुड्यांना हे देतात. त्यामुळे दहा रुपयापासून देशी विदेशी दारू मोजमापानुसार विकली जाते. हा प्रकार आमच्या सारख्या रोजमजुरी करून पोट भरणाऱ्या घरमालकासह मुलांना व्यसनाधीन करणारा आहे. त्यामुळे पोलिसांनी सरसम आबादी व सरसम गावात अवैधरीत्या विक्री करणाऱ्या दारू विक्रेत्यांना जरब घालून गावातून कायमची दारू बंद करावी अशी मागणी पत्रकारांशी बोलताना महिलांनी केली आहे.