हिमायतनगर तालूक्यातील वाळकेवाडी येथे आरोग्य शिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा
हिमायतनगर। मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष मुंबई यांची संकल्पना आणि, हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या सहकार्याने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकारातुन तालुक्यातील मौजे वाळकेवाडी येथे दिनांक २२ गुरूवारी भव्य महा रक्तदान शिबीर व तसेच शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त व मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संकल्पनेतून व तसेच हिंगोलीचे लोकप्रिय खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या सहकार्याने, आणी शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकारातून मौ. वाळकेवाडी येथे ता. २२ गुरूवारी सकाळी ९ वाजता रामबापू मंदिर परिसरात भव्य महा रक्तदान शिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा संपन्न होणार आहे.
लायन्स क्लब नांदेड, तालूका आरोग्य अधिकारी कार्यालय हिमायतनगर यांच्या सौजन्याने संपन्न होणार असलेल्या भव्य शिबिरात मोफत डोळे तपासणी, मोती बिंदू शस्त्रक्रिया तपासणी, डोळ्याला पडदा येणे, मास चढणे, लहान मुलाचा तिरळेपना, डोळ्यातून चिकट पाणी येणे,एन सीडी तपासणी, उच्च रक्तदाब, मधुमेह, शुगर तपासणी, शिकल सेल तपासणी, स्त्री रोग तपासणी, संशयित कर्क रोग तपासणी,आदि तपासण्या करण्यात येवून आवश्यक ते उपचार करण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
तसेच पंतप्रधान जन आरोग्य गोल्डन कार्ड काढणे व वाटप करणे, पंतप्रधान मातृत्व वंदना योजना नोंदणी, आधार कार्ड अपडेट करून देणे, दुर्धर आजाराने पिडीत रुग्णाची नोंदणी व पुढील मदत व मार्गदर्शन,आणी किरकोळ आजारांवर आवश्यक ती औषधी पुरवठा व वाटप करण्यात येणार आहेत. व तसेच मोती बिंदू ऑपरेशनसाठी आणी मोफत आयुष्यामान भारत गोल्डन कार्ड,पंतप्रधान जन आरोग्य योजना कार्ड नोंदणीसाठी आणावयाची आहेत
या मध्ये कागदपत्रे, रेशनकार्ड, आधारकार्ड सोबत आवश्यक आहेत. या भव्य दिव्य महारक्तदान शिबीर व शासकीय योजनांचा महामेळा या कार्यक्रमाचा सर्व जनतेंनी लाभ घ्यावा. असे अवाहन मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष तथा जनसंपर्क अधिकारी दादासाहेब थेटे, मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष समन्वयक ज्ञानेश्वर अधूडे, गोविंद गोडसेलवार यांनी केले आहे.