हाळी-हंडरगुळी येथील नवतरुणांचे आता एकच “मिशन” 31 डिसेंम्बर; शांतता भंग होऊ शकते! “वाॅच” ठेवा
हंडरगुळी/उदगीर/लातूर| सध्या हाळी व हंडरगुळी येथील नवतरुणांमध्ये फक्त 31 डिसेंम्बर कसा व कुठे साजरा करावा. यावरच “डिसकस” होताना ऐकू येत आहे. यावरुन येथील कांही युवकांचे “एकच मिशन” थर्टी फस्ट सेलिब्रेशन हेच आहे. तेंव्हा पोलिस प्रशासनाने याकडे बारकाईने “वाॅच” ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा मागच्या वर्षीसारखा मेन रोडवर “राडा” होऊ शकतो.
सरत्या वर्षाला निरोप देणे व नववर्षाचे स्वागत करणे.यासाठी हर एक भारतीय नागरिक आपापल्या परीने “फंडे” वापरतात.तर ‘यंगस्टार’ माञ जरा हटके “फंडे” वापरतात. कांहीजण बेभान होऊन सार्वजनिक ठिकाणी “धांगडधिंगा” करतात.अण् या “धिंगाण्या”चा सामान्य जनतेला हकनाक ञास होतो.तसेच शांतता / सामाजिक शांततेचा भंग केला मनून आजवर येथे कारवाहीचे धाडस कुणी पण दाखविले नसल्यानेच येथे सतत मेन मार्केटसह गल्लीबोळात ‘धिंगाना’ करायची प्रथाच पडली आहे. त्यात आता थर्टी फस्ट म्हणटल्यावर तर धिंगाण्याबद्दल बोलायलाच नको. “सेलिब्रेशन” करा.
तो हक्क सर्वांनाच आहे पण भान ठेवुन करा. याकडे माञ कुणाचेच लक्ष नसते.म्हणुन बर्थ डे असो वा थर्टी फस्ट.सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करायचा “फंडा”च कांहीजणांनी सुरु केलाय. तेंव्हा अशा लोकांवर “वाॅच” ठेऊन कारवाही होणे गरजेचे आहे.अशी चर्चा जाणकार जनतेतून होत आहे. तसेच या भागात जागोजागी हाय- फाय ढाबे,बार झाले आहेत.आणि 31 रोजी मध्यराञी पर्यंत हे उघडे ठेवायचे परमिट शासनच देते. माञ या परमिटचा अनेकजण गैरफायदा घेत असल्याचे दिसते. तसेच हळी-चाकुर व शिरुर रोडलगत तसेच हळी-उगीले पाटी कुमठा-शिवनखेड रोड लगत असलेल्या ढाब्या अवैध दारु विक्री वर्षानुवर्षापासुन खुलेआमपणे होते.
तसेच वरील ठिकाणच्या ढाब्यात अवैध दारु विक्री व प्राशन करत असले तरी आजवर दारुबंदी खात्याने कारवाही करण्याऐवजी “मलीदा” घेऊन जाण्यातच “धन्यता” का दाखवली.असा सुर उगले पाटीवर कांही नागरिकांतुन ऐकू येतो.म्हणुन यंदाचा थर्टी जल्लोषात व आनंदात साजरा व्हावा.असे प्रशासनास वाटत असेल तर वरील ठिकाणच्या अवैध दारु विकणा-या ढाब्यावर तसेच युवा वर्गाच्या धिंगाण्यावर “वाॅच” ठेवणे अति म्हत्वाचे आहे.तसेच”मटक्यावर” “वाच”ठेऊन “धाडी”टाकणारे कर्तबगार Api भिमराव गायकवाड, Psi एम.के.गायकवाड,Hc संजय दळवे-पाटील हे याकडे नक्कीच “वाॅच” ठेवतील.अशी चर्चा हाळी व हंडरगुळीतील जाणकार व शांतता प्रिय जनतेतुन होत आहे.