नांदेड| हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शहरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास भर पावसातही समाज बांधवांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी वसंतराव नाईक स्मारक समितीचे पदाधिकारी, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज दि. 1 जुलै 2025 रोजी शेती व्यवसाय व शेतकरी यांचे दैवत हरित क्रांतीचे जनक वसंतरावजी नाईक यांच्या 112 व्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक पुतळा या ठिकाणी कार्यक्रमाचे संयोजक प्रकाश बाबाराव राठोड यांनी विनामूल्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. सदर शिबीर आयकॉन हॉस्पीटल नांदेड येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी आयकॉन हॉस्पीटलचे डॉ. पुरुषोत्तम पवार यांच्यासह त्यांच्या तज्ञ डॉक्टर मंडळींनी व सर्व स्टॉफने परिश्रम घेऊन हे महाआरोग्य शिबीर यशस्वी केले. या शिबीरात जनरल मेडिसीन, नेत्रविकार तज्ञ, अस्थि विकार तज्ञ, स्त्री रोग व प्रसुतीतज्ञ, शल्य चिकित्साशास्त्र तज्ञ यासह भव्य रक्तदान शिबीर व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच आवश्यकतेनुसार गरजवंत रुग्णांवर विनामूल्य शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. यावेळी आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, गुरुद्वारा लंगर साहिबचे श्री संत बाबा बलविंदरसिंघजी, बी.आर. कदम, दिलीप कंदकुर्ते, बालासाहेब माधसवाड, ओबीसी नेते एस.जी. माचनवार, सुशीलकुमार चव्हाण, माजी नगरसेविका श्रद्धा चव्हाण, डॉ. शंकरराव चव्हाण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, उप अधिष्ठाता डॉ. वाय.एस. चव्हाण, मनपाचे सहाय्यक आयुक्त डॉ. अजितपालसिंघ सिद्धू, सहाय्यक आयुक्त सौ. सुप्रिया तलवारे, सहाय्यक आयुक्त मनिषा नरसाळे, मुख्य उद्यान अधीक्षक डॉ. मिर्झा फरहत बेग, सहाय्यक आयुक्त राजेश जाधव यासह आदी मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावून वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

यावेळी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रक्तपेढी, प.पू. गोळवलकर गुरुजी रक्तपेढी व श्री हजुर साहेब रक्तपेढी च्या वतीने रक्तसंकलन करण्यात आले. यावेळी जवळपास 100 पेक्षा जास्त बॉटल रक्त संकलन झाले. तसेच गुरु नानक शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथकासह भव्य रॅली काढून वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
हा जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी वसंतराव नाईक स्मारक समितीचे सचिव प्रकाश बाबाराव राठोड, विजय पवार, कैलास खसावत, भगवान राठोड, लवकुश जाधव, कैलास राठोड, कैलास चव्हाण, अखिल राठोड, अर्जुन राठोड, रवी राठोड, संजय जाधव, ऋतीकेश राठोड, राजू जाधव, संदीप जाधव, नितीन आडे, नकुल चव्हाण, राजासिंग राठोड, शेरसिंघ राठोड, भारत चव्हाण, बाबुसिंग राठोड, रामसिंग राठोड, पी. बिंदू नाईक, साहेबसिंग राठोड, संजय चव्हाण, सिताराम राठोड, अॅड. दिलीप राठोड, माजी पोलीस निरीक्षक गणपत राठोड, माजी पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण, प्रा. एन.पी. पवार, प्रफुल्ल राठोड, संध्याताई राठोड, राजासिंग राठोड, रावसाहेब राठोड, मनोहर राठोड, रवी जाधव, भारत चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. यावेळी शेकडो समाज बांधव भरपावसातही उपस्थित होते. शेवटी महाप्रसाद व आईस्क्रीम वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
