उस्माननगर। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकाच्या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. व सायंकाळी ठिक ६ वाजता , नागवंशी बौद्ध विहार येथून प्रमुख रस्त्यांने पणती ज्योत हातात घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या जय घोषणाबाजी करत स्मारकाच्या नियोजित जागेपर्येत रॅली काढण्यात आली.
उपा.गंगाधर केरबाजी कांबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली नागवंश बुध्दविहार ते स्मारकाच्या नियोजित जागेपर्यंत पणती ज्योत रॅली काढण्यात आली होती.यावेळी समाजातील सर्व उपासक, उपासिका, बालके व सर्व समाजबांधवांची उपस्थिती होती. त्यानंतर स्मारकाच्या ठिकाणी आयु. चंचल प्रमोद सोनसळे ,व तेजस्वीनी साहेबराव कांबळे यांनी सामुहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले. अभिवादन करण्यात आले.
यावेळी , उपा.देवरावजी सोनसळे,( मा.उपसरपंच) गंगाधर कांबळे, माणिक सोनसळे, बाबाराव सोनसळे, गोविंदराव भिसे, आयु. अंगुलीकुमार सोनसळे ( ग्रामपंचायत सदस्य ), मुख्याध्यापक राहूल दे. सोनसळे,( मा . उपसरपंच ) राहुल कि. सोनसळे, पत्रकार लक्ष्मण कांबळे, माणिक भिसे, हर्षवर्धन सोनसळे, अभिजीत सोनसळे, धम्मानंद कांबळे, लखन सोनसळे ,चावरे , बहुजन समाजातील महिला,युवक ,तरुणी मोठ्या संख्येने समाजबांधवांनी हातात पणती ज्योत मध्ये उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.