ज्येष्ठ नागरिकांच्या “कृतज्ञता फेरिस” उदंड प्रतिसाद..! ज्येष्ठ नागरिक आदर्शवत फेरिचे पोलिस प्रशासनाकडून कौतूक – डाॅ.हंसराज वैद्य
नांदेड| केंद्र शासन व राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांचे समाज व राषाट्र उभारणीत आयुष्यभर केलेले योगदान तथा त्याग लक्षात घेऊन त्यांच्या प्रती साहनुभूती व्यक्त करून केंद्र शासनाने देशात “पंतप्रधान वयोश्री योजना”,तर राज्य शासनाने राज्यात “मुख्य मंत्री वयोश्री योजना” कार्यान्वीत केलेली आहे.एवढेच नाही तर महाराष्ट्र शासनाने 65 वर्षावरील कांही ज्येष्ठ नागरिकांनां एक रकमी 3000/-रू ही देण्याचे मान्य केलेले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनां फार मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्र व राज्य शासनाचे,प्रशासनाचे,वृतपत्र संपादकांचे,प्रसार माध्यम प्रमुखांचे,आणि ज्येष्ठ नागरिकांवर प्रेम करणार्या सर्व समाज बांधवांचे धन्यवाद तथा अभार मानण्यासाठी शहरात सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ, वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघ,व नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने, मा.श्री. सुभाषरावजी बार्हाळे व सौ.निर्मलाताई बार्हाळे यांच्या संकल्पनेतून नांदेड भूषण ज्येष्ठ नागरिक नेते डाॅ.हंसराज वैद्य, रामचंद्र कोटलवार,गिरिष बार्हाळे,प्रभाकर कुंटूरकर यांच्या नेतृत्वाखाली तथा दलित मित्र माधवराव पवार,सौ.डाॅ.ज्योति डोईफोडे,सौ.डाॅ.लक्ष्मी पूरणशेट्टीवार,डाॅ.पुष्पा कोकीळ, श्रीमती प्रभा चौधरी,श्री भूताळे, श्री.सायन्ना मठकमवार,जिंतूरकर सौ.सुशीला बाई परिहार, सौ.पवार बाई,श्री व सौ.काप्रतवार, मिर्झा बेग इ.च्या मार्ग दर्षणाखाली “कृतज्ञता फेरी”काढण्यात आली .फेरिस उदंड प्रतिसाद मिळाला.मराठा आरक्षणासाठी रस्ते,वाहने बंद असताना सुद्धा मिळेल त्या वाहानांनी, जमेल त्या मार्गांनी, जमेल तेव्हा,जमेल तसे गरजवंत, उपेक्षित,दुर्लक्षित,वंचित शेतकरी,शेत मजुर, कष्टकरी, कामगार,विधवा तथा दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांनी नांदेड जवळ चकरून फेरित व नंतरही सहभाग नोंदविला.फेरी अतिशय स्वंय शिस्तीत होती.
प्रचंड संंखेनी (प्रसार माध्यम प्रतिनिधींच्या मते 5000हजाराहूनही जास्त)ज्येष्ठ नागरिक सहभागी झालेले होते.कसल्याच घोषना दिल्या जात नव्हत्या. .ईच्छा असूनही कांहीना जमले नाही.फेरीचे पोलीस प्रशासनाने कौतूक केले. “कृतज्ञता फेरिची” सुरूवात वजिराबाद चौकातून संत बाबा बलविंदर सिंघजींच्या हस्ते नारळ फोडून व हिरवि झेंडी दाखऊन करण्यात आली. बाबाजींनीं फेरिला व फेरीतील सहभागींनां कृपाशिर्वाद दिला. छ.शिवाजी महाराज,ते म.गांधीजींच्या पुतळ्याला वळसा घालून पुतळ्यासमोर फेरी आली. कृतज्ञता फेरिस मा.सुभाषजी बार्हाळे,प्रभाकर कुंटूरकर,रामचंद्र कोटलवार, अॅड.सौदंते,डाॅ.ज्योती ताई डोईफोडे,श्रीमती सुशिलाताई परिहार आणि सौ.पवारताई (लोहा) आदिनीं येथोचित मार्ग दर्शन केले.श्रीमती जाणकाबाई (उंचेगाव)यांनी उपस्थितांना गौळण गाऊन मार्गदर्शन केले .
शेवटी ज्येष्ठ नागरिक नेते डाॅ.हंसराज वैद्य यांनी शासनांचे अभार तर मानलेच पण शासनांस विनंती केली की,फेस्काॅमच्या प्रथम प्रलंबित मागण्या मान्य करणें हे शासनाच्या व ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने गरजेचे व फायद्याचे असल्याचे नमूद केले.अनेक योजनांच्या पेक्षांही सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिक धोरणाची,ज्येष्ठांसाठींच्या कायद्यांची व नियमांची काटेकोर अंमलबजावनी,जागतिक पातळीवर व भारत देशातील इतर राज्यां प्रमाणे वयोमर्यादा साठ(60)च ग्राहय धरणें,विरंगुळा,तिन-पांच-सात तारांकित वृधाश्रमं काढणें,पासष्ठ(65) वर्षावरिल नागरिकांसाठीच्या योजना, आठवड्यातून दोन दिवसाच्या सवलती रेल्वे,बस,विमानाच्या योजना,इकडे रेशन कार्ड काढणे बंद करून रेशन कार्डाची अट घालणें अशा फसव्या सवलतीच्या योजना शासनाने जाहिर न करता ,शेजारील आंध्रप्रदेश,करणाटक,तेलंगाना राज्यांप्रमाणे मानधन देणें उत्तम तथा हिताचे आहे.माझ्या सारख्या वयो वृद्ध व श्रीमंत ज्येष्ठ नागरिकांनां नको पण गरिब गरजवंतांनां प्रतिमहा साडेतिन हजार(3500/-)रू फक्त(दोनदाचे जेवन,चहा पाणी) ध्यावेत.
यामुळे ज्येष्ठ नागरिक मुलं- सुनांनां तथा कुटूंबाला ओझे किंवा भूर्दंड वातंटणार नाहीत. कंटाळवाने तथा नकोसे वाटणार नाहित. झोपडीतील स्वकुटूंबातच तारांकित वृद्धाश्रमा पेक्षा सुखा समाधानाने वआनंदाने जीवन जगतील.आधार कार्डच ग्राहय धरावे.इतर कोणतेही कार्ड काढण्याची अट घालू नये.आरोग्य विमा शासनानेच भरावा.ज्येष्ठ नागरिक ही राष्ट्रीय संपत्ती घोषित करावी.विधान परिषद व राज्य सभेवर 1-1 ज्येष्ठ नागरिक चळवळीची जाण असलेल्या कार्य कर्त्याची निवड करण्याची तरतूद करावी.येत्या अर्थ संकल्पीय अधिवेशनातच गरजवंत ज्येष्ठ नागरिकांच्या मान धनासाठी भरिव तथा विशेष अर्थिक तरतूद करावी. केंद्र व राज्य शासनाचे अभिनंदनाचे तथा कृतज्ञताचे पत्र मा.जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले व फेरीची सांगता झाली.