नांदेड| राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समिती महाराष्ट्र राज्य अंतर्गत नांदेड जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावे म्हणून भव्य मोर्चा संपन्न झाला . महात्मा फुले पुतळा आयटीआय पासून शिवाजीनगर कलामंदिर शिवाजी पुतळा मार्गे सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड असे मार्गक्रमण करीत अधिकारी व कर्मचारी शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावे म्हणून परिसर दणानून सोडला होता .
मागील वीस वर्षापासून अतिशय तुटपुंज्या मानधनावर खेडोपाडी व शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी सेवा देत असून इतर पाच राज्यात अशाच प्रकारच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्यात आले असून त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही आरोग्य विभागातील कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते .२५ ऑक्टोबर २०२३ पासून नांदेड जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर समायोजन कृती समिती तर्फे बेमुदत धरणे आंदोलन चालू असून त्याचाच भाग म्हणून सदर मोर्चा संपन्न झाला .
सदर मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीचे नांदेड जिल्हाध्यक्ष संजय देशमुख ,समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.प्रकाश मारावार ,जिल्हा समूह संघटक सिद्धार्थ थोरात ,आयटक कंत्राटी नर्सेस युनियनच्या कार्याध्यक्षा श्रीमती रेखा टर्के ,सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कंत्राटी कर्मचारी संघटनेचे अधिकारी व कर्मचारी ,कुष्ठरोग तंत्रज्ञ संघटना आयुष आरोग्य अधिकारी संघटना आरबीएसके संघटना ,राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी महासंघ कास्ट्राईब संघटना ,राष्ट्रीय आरोग्य अभियान लेखापाल संघटना महाराष्ट्र राज्य कंत्राटी औषध निर्माण कृती समितीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या मोर्चात भव्य स्वरूपाने सहभागी होऊन आपल्या मागण्यांचे एक निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल व उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांना सुपुर्द केले . राष्ट्रगीत गावून मोर्चाचा समारोप करण्यात आला.