गोमाता… गौरी… गंगेची सुरक्षा खूप महत्वाची आहे हे तुम्ही – आम्ही जाणल पाहिजे – पपु.गजेंद्र चैतन्य महाराज
हिमायतनगर, अनिल मादसवार| रामकथेत आम्ही एकरूप झालो.. आम्ही कथेत असतो पण कथा आमच्यात नसते हा गोंधळ होतो. हा गोंधळ होऊ नये म्हणून रामचरित्र मानस कथा आहे. हि कथा घराघरातील कथा आहे…. पेंडॉलमध्ये बसून ऐकण्याची नाही… कथेतील राम आपल्या घराघरामध्ये असणे आवश्यक आहे. आजकाल रावणाची संख्या जास्त झाली आहे…. राम मात्र अजूनही नाही…त्यावेळी रावणाने एकच सीता चोरून नेली आणि आजकालचे रावण तर सीतेचे वयदेखील पाहत नाहीत. विषय खूप महत्वाचा आहे… नुकतीच नांदेड जिल्ह्यात एक घटना घडली एका पहिली – दुसऱ्या वर्गात शिकणारी मुलगी….. ती गौरीचं आहे आमच्यासाठी….. ती सीताच आहे आमच्यासाठी…. मी नेहमी सांगतो आज खूप मोठा प्रश्न या युगामध्ये भेडसावत आहे… ना आज गोमाता सुखी आहे… ना आज गंगा सुखी आहे… ना आज गौरी सुखी आहे…. काळात असेल तर तुम्हाला आत्मचिंतन करा… ना गोमाता सुखी आहे… तुम्ही म्हणसाल ना काय गजेंद्र महाराज कायदा केला ना सरकारने …. कायदा केला तो फक्त फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यापुरता आहे. कायदा करूनही कळपच्या कळप.. गोमातेची तस्करी करताना दिसून येत आहेत. ट्रकच्या ट्रक… त्यामध्ये मावत नाहीत… कोंबू कोंबून भारतायत.. कायद्यावर मला बोट ठेवायचा नाही… कायदा केलाय खरा परंतु त्याची अंमलबजावणी किती होतेय… मग कधी कधी असा वाटतंय… कायदा करणारे तूम्हीच… गोमातेची चोरी करणारे तुम्हीच…. आणि कदाचित त्यांच्या सानिध्यात बसून खाणारे तुम्हीच…अस नाईलाजाने म्हणाव लागते… गरज आहे हि आज प्रत्येक घरात रावण आहे. कुठचा रावण गोमातेवर तापला….कुठचा रावण गौरीवर तापला… …. तर कुठला रावण गंगेवर तापलंय … तिन्ही गोष्टी आज खूप महत्वाच्या आहेत आम्ही जाणल्या पाहिजेत आणि त्यांची सुरक्षा केली पाहिजे. आज जी स्थिती उद्धभवली आहे त्याला कारणीभूत माणूस आहे… असा उपदेशही पपु.गजेंद्र चैतन्य महाराज यांनी केला.
संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या आयोध्या येथील श्रीराम मंदिरात दिनांक 22 जानेवारी रोजी राम लल्लाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यानिमित्ताने हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान कमिटी कडून दिनांक 16 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान प. पु. बालयोगी गजेंद्र महाराज यांच्या मधुर वाणीतून राम कथा सांगितली जात आहे. या राम कथेला हजारो महिला व पुरुष भाविक भक्तांचा प्रतिसाद मिळत असल्याने शहरात भक्तीमय आणी भगवेमय वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या सहा दिवसापासून परमपूज्य बालयोगी गजेंद्र महाराज यांच्या मधुर वाणीतून राम कथा सांगितली जात आहे. उपस्थित भाविकांना गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिलेल्या श्रीराम चरित्र मानस ग्रंथातील सार सांगत रामकथा हि प्रत्येक घरातील कथा आहे. असे सांगत घरातील रामकथा हि पेंडॉलमध्ये आली आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखाचे किरण दाखवणारी ही रामकथा असून, रामकथा तुमच्या माझ्या जीवनातील दुःख मिटवणारी रामकथा… माणसाला माणूस बनवणारी कथा म्हणजे रामकथा असुन, मर्यादाचे परिपालन कस करायचे ते रामकथा शिकवते म्हणून प्रत्येकानी राम चरित्र मानस कथा श्रवण केली तर जिवनाला कलाटणी मिळाल्याशिवाय राहणार असे उपस्थित भाविकांना प. पू. बालयोगी गजेंद्र चैतन्यजी महाराज सांगून श्रीरामकथेचे महत्व अगदी सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत.
हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात संगीतमय रामकथा प.पु. बालयोगी स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांच्या मधुर वाणीतून सुरू आहे. या कथे प्रसंगी भाविकांना संबोधत करताना गजेंद्र महाराज म्हणाले की रामचरित्र माणस कथा हि माणसाला माणूस बनवणारी कथा आहे. एक महिना भारद्वाज मुनींनी गायलेली कथा रूषी, मुनी, प्ररोज, किनर, नर्सरी देव साधू संतानी ऐकली आहे. आपल्याच भुमित आपल्याच आराध्याला त्याच्या हक्काची जागा मिळावी ह्यासाठी पाचशे वर्षापासून असंख्य भक्तांनी अनेक संघर्ष करत बलीदान दिली. आज प्रभु रामचंद्र त्यांच्या जन्मस्थानावर विराजमान होताना बघण्याच भाग्य 22 जानेवारीला तुम्हा आम्हा सर्व भारतीयांना लाभणार आहे. त्या पर्वावर परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीच्या वतीने आयोजित भव्य रामकथा सोहळा होतो आहे. रामकथा दरवर्षी ऐकण्यासाठी मिळेल परंतु यावर्षीचा योग्य हा पुन्हा येणारा नाही म्हणून प्रत्येक भक्तांनी हि कथा श्रवण करावी असंख्य ज्ञात अज्ञात राम भक्तांच्या प्रभू रामचंद्रावर असलेल्या अस्थेचे प्रतिक असलेले हे राम मंदिर आपल्याला रामायणातील प्रत्येक व्यक्तीमत्वाची आठवण करून देत राहणार आहे. हा सोहळा आनंदाने भक्तीभावाने साजरा करू ज्यांच्या पवित्र स्पर्शात निर्जीव वस्तुचेही रुपांतर होण्याचे दिव्यत्व होते अशा रामनामाचे संकीर्तन करून आपल्या मनात राम जागवू या असे विस्तृत रामकथा सोहळ्यात भाविकांना गजेंद्र चैतन्य महाराज यांनी केले. या रामकथा सोहळ्यास पंचक्रोशीतील भाविक महिला पुरुषांची गर्दी केली आहे.
भव्य रामायण कथा कार्यक्रम दररोज दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत चालत असून, सोमवार 22 जानेवारी रोजी अयोध्येत भगवान श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर श्री परमेश्वर मंदिर समितीतर्फे सर्व भाविकांच्या सहकार्याने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सकाळी 8 वाजता शहरातून हजारो महिलांची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढून प्रभू श्रीरामचंद्राच्या आगमनाचे स्वागत केले जर आहे. तसेच अयोध्येतील सोहळ्या दिव्य दर्शन प्रोजेक्टरच्या माध्यमातून श्री परमेश्वर मंदिरात दाखविण्यात येणार असून, सकाळी या धार्मिक व भक्तिमय कार्यक्रमाच्या निमित्ताने मंदिर परिसरात 5000 दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहे. या धार्मिक कार्यक्रमात जास्तित जास्त भाविकांनी उपस्थित होऊन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ व सर्व संचालक व गावकरी महिला पुरुष मंडळींनी केले आहे.