धर्म-अध्यात्मनांदेड

गोदावरी तीर्थक्षेत्र संस्थान श्री दत्तात्रय जन्मोत्सव 19 डिसेम्बर पासून

नांदेड| गोदावरी नदी येथील जुने धार्मिक तीर्थस्थल म्हणून ओळख असलेले गोदावरी तीर्थक्षेत्र संस्थान मोहणपूर मौ. वाहेगाव तालुका व जिल्हा नांदेड येथील पारंपरिक श्री दत्तात्रय जन्मोत्सव कार्यक्रमांची सुरुवात येत्या दि. 19 डिसेम्बर पासून होत आहे. दि. 28 डिसेम्बर पर्यंत धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सतत असणार असून दि. 26 रोजी श्री दत्तात्रय जन्मोत्सव साजरा होईल. अशी माहिती श्री महंत 1008 रामभारती गुरु मारोती भारती महाराज यांनी दिली आहे.

संस्थान मोहणपूर मौ. वाहेगाव दत्तात्रय ऊत्सवांतर्गत दि. 19 पासून प्रतिदिन सकाळी 8 वाजता श्री दत्तमूर्ती गंगाजल अभिषेक व बालक्रीडा ग्रंथाचे पारायण सकाळी 7 ते 9 दरम्यान होईल. तसेच दुपारी 2 वाजता जन्मोत्सव व महाप्रसादाचे आयोजन राहील. रात्री 9 ते 11 वाजता दरम्यान आनंद संप्रदाय कीर्तन व महापूजा कार्यक्रम होईल. आठवडाभर रात्रीचे कीर्तन होईल. यात तेलंगाना येथून श्री द. भ. प. मोहन महाराज इटोलीकर, श्री द. भ. प. मारोतराव महाराज, श्री द. भ. प. संतोषानंदपूरी महाराज (चोलाखा), श्री द. भ. प. प्रताप महाराज (पिंपळकौठेकर), श्री द. भ. प. कृष्णा महाराज राजुरकर, श्री द. भ. प. शहादत महाराज (सरेगावकर), श्री द. भ. प. रूद्रगीर महाराज किवळेकर यांचा सहभाग राहील. दि. 26 ते 28 दरम्यान कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे.

दि. 27 रोजी दत्तात्रय उत्सवांतर्गत विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. यात श्री महंत जिवनदास महाराज (संस्थान चूडावा, भोपाळ, जालना), मा. आ. श्री एकनाथराव खडसे (माजी महसूलमंत्री), मा. आ. श्री राम पाटिल रातोळीकर (विधान परिषद, नांदेड), मा. आ. श्री मोहनराव हंबर्डे (नांदेड दक्षिण), मा. श्री ओमप्रकाश पोकर्णा (माजी आमदार), मा. मीनल करनवाल (मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड), मा. दिलीप कंदकुर्ते (प्रदेश अध्यक्ष व्यापारी आघाडी भाजपा), मा. श्री विकास माने (उपविभागीय तथा दंडाधिकारी, नांदेड), मा. श्री जे. एल. चव्हाण (कार्यकारी अभियंता महावितरण), मा. डॉ नीलकंठ भोसीकर (जिल्हा चिकित्सक शासकीय रुग्णालय नांदेड), मा. श्री बालाजी पुणेगावकर (भाजपा जिल्हाध्यक्ष), मा. श्री राजेश गंगाधरराव कुंटूरकर (कुंटूर शुगर लि. कुंटूर),

मा. श्री मारोतराव व्यंकटराव कवळे गुरूजी (चेयरमैन, व्ही. पी. के. फूड्स सिंधी), मा. श्री गणेश दिगंबरराव महाजन (सौभद्र कलेक्शन नांदेड), मा. डॉ. क्रांतिकुमार राठोड (के.ए.एम. हॉस्पिटल मुंबई), मा. श्री आनंद भारती (संचालक संजय गांधी निराधार योजना), मा. श्री गंगाधर पाटिल सिंगनगावकर (तानुर मंडळ सभापती ), मा. श्री चंद्रकांत पाटिल (माजी नगराध्यक्ष), मा. सौ. संगीताबाई विठ्ठलराव डक (नगरसेविका नांदेड), मा. सौ. मीनाताई शंकर सोनटक्के (सरपंच ग्रा. पं. वाहेगाव), मा. श्री रविंद्रसिंघ मोदी पत्रकार, श्री नवनाथ येवले, श्री शिवाजी मोरे सोनखेड, श्री आनंदा बोकारे, श्री माणिक शिवरामजी मोरे (दै. देशोन्नति), श्री सुभाष पांचाळ यांची उपस्थिती राहणार आहे. दि. 28 रोजी जंगी कुस्ती दंगल होणार असून मा. श्री कैलास पाटिल, मा. श्री मारोती घोरपडे (माजी तं. मु. अध्यक्ष वाहेगाव), मा. श्री तुकाराम पवार (उप तालुका प्रमुख शिवसेना), मा. श्री शंकरराव सोनटक्के (सरपंच वाहेगाव) हे कुस्त्यांचे आयोजक असतील.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!