श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| महाराष्ट्रसह माहूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसाने हाहाकार माजवला होता माहूर गडावर आलेले हजारो भाविक पैनगंगा नदीवरील नवीन पूल बनले नसल्याने जुन्या पुलावरून पाच ते आठ फूट पाणी वाहत असल्याने तब्बल 18 तास पुलावरून वाहतूक बंद होती पर्यायी मार्गही व्यवस्थित नसल्याने हजारो भाविक पैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर रांग लावून वाहनात अडकून बसले होते. सदरील परिस्थिती पाहून एआयएमआयएमचा ध्येयवेडा तरून तालुका अध्यक्ष शेख सज्जाद शेख अजिज तसेच युवक एआयएमआयएमचे तालुका अध्यक्ष फैजुल्लाखान जर्दुल्लाखान पठाण यांनी हजारो फळांसह पानी बाटल्यांचे वाटप दि 16 रोजी रात्रभर करून भाविकांचे आशीर्वाद मिळविले.

दि 16 रोजी प्रचंड पाऊस पडल्याने दुपारपासूनच जुन्या पुलावरून पाणी सुरू झाल्याने प्रशासनाकडून पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली होती तसेच माहूर पोलीस ठाणे तहसील कार्यालया कडून मोठा फौज फाटा येथे तैनात करण्यात आला होता. तर विदर्भ किनाऱ्यावरून महागाव पोलीस आणि महसूल विभागाकडून मोठा बंदोबस्त दिवस रात्र तैनात करण्यात आल्याने दोन्हीकडून एकाही वाहनाला जाता येता आले नसल्याने माहूर गडावर आलेल्या हजारो भाविक आणि प्रवासी वाहनांना सुमारे 18 तास अन्न पाण्याविना दोन्ही किनाऱ्यावर थांबून राहावे लागले होते. तसेच मिळेल ते अन्न पाणी खाऊन रात्र काढावी लागली होती सदरील परिस्थिती पाहून शेख सज्जाद आणि फैजुल्ला खान यांनी माहूर शहरात येऊन मिळेल ती फळे पाणी बाटल्या घेऊन पैनगंगा किनारा गाठून सर्व वाहनात फळांचे वाटप केले यावेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनाही त्यांनी फळांचे वाटप केले.

माहूर गडावर वर्षभर यात्रा महोत्सव सुरू असतात सर्वधर्मीयांचे देवस्थाने येथे असल्याने वर्षभर गडावर ट्राफिक जामचा अनुभव येत असतो केंद्रीय मंत्री नितीन जी गडकरी यांनी माहूरला राष्ट्रीय महामार्गाशी जोडले यामध्ये पैनगंगा नदीवर मोठे पूल तयार करण्यात आले. परंतु दोन्ही बाजूने अर्धा अर्धा किमी चा रस्ता कंत्राटदारांनी बनविला नसल्याने गेल्या अनेक वर्षापासून दरवर्षी पैनगंगा नदीला पूर येत असतो. त्याचा फटका लाखो भाविकांनी घेतला असूनही गेल्या सात वर्षापासून नवीन पुलावरील वाहतूक सुरू होऊ शकली नसल्याने आडकलेल्या भाविकातून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि कंत्राटदाराविरुद्ध प्रचंड रोष दिसून आला .

परंतु माणुसकी जिवंत ठेवत शेख सज्जाद आणि फैजूल्ला खान यांनी रात्रभर आलेल्या हजारो भाविकांना फळांचे आणि पाणी बाटल्यांचे वाटप करून माणुसकी दाखविल्याने आलेला प्रत्येक भाविक त्यांना आशीर्वाद देत होता. यावेळी शहजाद नवाब, आरसलान शेख, कयुम शेख, अय्युब शेख, अजीज शेख, शोहेब शेख, सलीम शेख, शैजाद, नवाब, अर्शद शेख, शाहिद लाला तसेच शेख सज्जाद भाऊ मित्रमंडळाच्या मित्रांनी त्यांना रात्रभर सहकार्य केले.
