नांदेड| स्वाधारची प्रलंबित रक्कम मिळवून द्यावी अशी मागणी फुले- शाहू- आंबेडकर विद्यार्थी कृती समितीच्या वतीने भाजपाचे जिल्हा सरचिटणीस साहेबराव गायकवाड यांच्या माध्यमातून खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असून या योजनेपासून नांदेड जिल्ह्यातील जवळपास आठ हजार विद्यार्थी वंचित आहेत. स्वाधारची रक्कम प्रलंबित ठेवण्यात आली असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागत असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून द्यावा असे फुले -शाहू- आंबेडकर विद्यार्थी कृती समितीने निवेदनात नमूद केले आहे. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस साहेबराव गायकवाड, फुले- शाहू -आंबेडकर विद्यार्थी कृती समितीचे कुणाल भुजबळ, लक्ष्मण वाठोरे, गजानन नरवाडे, प्रबुद्ध काळे, प्रतीक्षा कांबळे, प्रकाश इंगोले आदी उपस्थित होते.