नांदेड। दिनांक 20.04.2023 रोजी मा. श्री. सुरज गुरव, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग नांदेड शहर हे सपोनि चंद्रकांत पवार, पोलीस ठाणे लिंबगांव यांचेसह त्यांचे कार्यालयामध्ये मोक्का गुन्हयाचा तपास करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, हिंगोली गेट ओव्हरब्रिजचे खाली एक ईसम आपले ताब्यात गावठी पिस्टल बाळगुन आहे.
सदरची माहीती मा. श्री. सुरज गुरव यांनी मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, यांना दिली. त्यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. वजीराबाद येथील अशोक घोरबांड, पोलीस निरीक्षक व त्यांचे अधिनस्त गुन्हे शोध पथकाचे अधिकारी शिवराज जमदडे, सपोनि, चंद्रकांत पवार सपोनि, पोहेकों/ दत्तराम जाधव, पोना/ गजानन कदम, विजयकुमार नंदे, पोकों/ रमेश सुर्यवंशी, शेख ईम्रान यांचे पथक स्थापन करुन त्यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीबाबत कळवून कायदेशिर कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या.
सदर सुचनेप्रमाणे नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी हिंगोली गेट ओव्हरब्रिजये खाली सापळा रचुन मिळालेल्या माहीती मधील वर्णनाच्या मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली असता सदरचा मुलगा मिळुन आला. त्यास त्यांचे नांवगांव विचारणा करता त्यांनी आपले नांव सुमेर पिता महेशसिंह बैस, वय 26 वर्षे व्यवसाय मजुरी राहणार गाडीपूरा धोबीगल्ली नांदेड असे सांगितले. त्याचे ताब्यातील थैलीची पंचासमक्ष झडती घेतली असता झडतीमध्ये दोन गावठी पिस्टल व सहा जिवंत काडतुस मिळुन आले. त्याबाबत त्यास विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्यायेकडील पिस्टल व काडतुस असे 40,600/- रुपयाचा ऐवज पंचासमक्ष जप्त करुन अवैद्य शस्त्र बाळगले प्रकरणी सपोनि शिवराज जमदडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीस ठाणे वजीराबाद, नांदेड गु.र.न 531/2023 कलम 3/25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास सपोनि रामदास केंद्र हे करीत आहेत,
सदरची कार्यवाही ही मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री. अविनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन सदर कार्यवाहीमध्ये दोन गावठी पिस्टल, 06 जिवंत काडतुस, 01 मॅग्झीन, असा 40,600/- रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.