हडको येथील श्री. बालाजी मंदिरात ब्रम्होत्सवाला सुरूवात, वडा व बुंदीलाडुला मागणी
नवीन नांदेड। हडको येथील श्री. बालाजी मंदिर देवस्थान येथे २१ वा दसरा ब्रम्होत्सवाला १५ आक्टोबर पासून सुरूवात झाली असून मंदीर सजावट सह गंगाळ मधील वडा व बुंदी लाडुला मोठया प्रमाणात मागणी पहिल्या दिवशी झाली असून भाविक भक्तांनी मोठया प्रमाणात दर्शन साठी गर्दी केली आहे.
हडको बालाजी मंदिर देवस्थान आनंदसागर सोसायटी येथे 21 वा दसरा ब्रह्मोत्सवा निमित्ताने दि.15 ते 24ऑक्टोंबर 23 दरम्यान सकाळी व सायंकाळी दैनंदिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, आचार्य पंडिताचा मार्गदर्शन खाली पुरोहित सतिश गुरू पोतदार,विनायक गुरू परळीकर,इंद्रमुनीं दुबे,प्रकाश महाराज हे विधीपूर्वक करणार आहेत.यात दि.15 ते 24 ऑक्टोंबर दरम्यान दि 15 रोजी सकाळी 4 वाजता सुप्रभात, 5 ते 7 बालभोग, आरती,8 ते 10 ध्वजारोहण, देवता स्थापना,कलश स्थापना,अंकुर रोपण, व होम हवन ने सुरुवात होईल व दुपारी 2 ते 4 विष्णुसहस्त्र नाम सायंकाळी 4 ते 6 होमहवन होणार तर ब्रम्होत्सव दरम्यान सकाळी दैनंदिन व सायंकाळी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.
मिरवणूक 24 ऑक्टोबर रोजी दसरा निमित्ताने होम, हवन, व प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. गंगाळ मधील वडा व बुंदीलाडुला मोठया प्रमाणात मागणी केली असून तिरूपती बालाजी नंतर हडको येथील श्री बालाजी मंदिरात हा वडा तयार करण्यात येत असून भाविक भक्तांनी मोठया प्रमाणात मागणी केल्याने पहिल्या दिवसापासून मागणी वाढु लागली आहे, पहिल्या दिवशी ब्रम्होत्सवा निमित्ताने मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली होती.
महाप्रसाद करण्यासाठी आचारी बालाजी आनेराये,यांचा मार्गदर्शनाखाली हरिराम आणेराये, मारोतराव चपटे, सखाराम जाधव, ईश्वर बागुल,स़जंय भाडेकर यांच्या सह दहा महिला प्रसाद तयार करण्यासाठी ब्रम्होत्सवा निमित्ताने होम हवन व कल्याण उत्सव पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली यजमान यांच्या उपस्थितीत होणार असून आजीवन प्रसाद भोग यजमान नोंदणी शुल्क 1500/ , व दहा वर्षीय अभिषेक सेवा नोंदणी चालू असून अभिषेक नोंदणी म्हणून शुल्क म्हणून ३१०० रुपये चालु असुन ब्रम्होत्सव मध्ये भाविक भक्तांनी सहभागी होण्याचे व दसरा ब्रह्मोत्सवा निमित्य आयोजित कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अरुण दमकोडंवार ,उपाध्यक्ष विवेकानंद देशमुख,सचिव बालकृष्ण येरगेवार ,कोषाध्यक्ष करणसिंग ठाकूर सहसचिव प्रकाशसिंह परदेशी, संस्थापक अध्यक्ष माणिकराव देशमुख ,संतोष वर्मा,बाळासाहेब मोरे,अजय भंडारी ,गोवर्धन बियाणी , सचिन नपाते ,संजिवन राजे ,चंद्रशेखर चव्हाण, सुभाष कारंजकर ,किशोर देशमुख, चंद्रशेखर चव्हाण यांनी केले आहे.