नवीन नांदेड। महाराष्ट्र राज्याचे माजी अपारंपरिक ऊर्जामंत्री व जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.विनय कोरे यांनी आज १८जानेवारी २४ रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील सामाजिक शास्त्रे संकुलतील समाजकार्य विषयात शिकणारे पदव्युत्तर वर्गातील विध्यार्थी स्टडी टूर च्या माध्यमातून वारणा समूहास भेट दिली व विधार्थी यांच्याशी संवाद साधला.
वारणा समूहाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे विध्यार्थीना मार्गदर्शन करण्यासाठी स्वारातीमवि चे व्यवस्थापन परिषद सदस्य हणमंत कंधारकर यांनी विनंती केली आणि माजी मंत्री विनय कोरेनी क्षणाचा ही विचार न करता थेट विध्यार्थी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी येऊन सर्व विध्यार्थीशी विविध विषयावर मनमोकळेपणाने चर्चा केली व विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांमध्ये रममाण झाले.
विद्यार्थ्यांना स्टडी टूर आनंदात जावा यासाठी शुभेच्छा दिल्या.या वेळी उपस्थित सर्व विध्यार्थी व विद्यार्थिनीच्या तसेच विद्यापीठाच्या वतीने डॉ.नितीन गायकवाड यांनी माजी मंत्री विनय कोरे यांचे आभार मानले.या वेळी प्रा. दत्ता हळदे व समाजकार्य विषयाचे अनेक विध्यार्थी उपस्थित होते.