नांदेड/उमरी। इंग्रजी आणि समाजशास्त्र या विषयात पारंगत असलेल्या प्रा. राजश्री सुरेश सावरगावकर यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांना २०२४ या वर्षीचा त्यागमूर्ती माता रमाई समाजभूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जाते आहे.
दि.०७ जानेवारी २०२४ रोजी नांदेड शहरातील डॉ. शंकरराव चव्हाण सभागृह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते माता रमाई समाजभुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल नांदेड जिल्हा डिजिटल मीडिया कार्याध्यक्ष अनिल मादसवार, प्रा हर्षवर्धन ढवळे, रवी ढवळे, शशिकांत ढवळे, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर ढवळे, किशनराव ढवळे सामजिक कार्यकर्ते शेषरावजी धावणे रत्नाळीकर, शशिकांत ढवळे, किशनराव ढवळे, सुरेश धावणे, दामोदर ढवळे, आदी व अनेक क्षेत्रातून त्यांच्या मित्र परिवारातर्फे व रिपब्लिकन सेना व वंचित बहुजन आघाड़ी व भारतीय बौद्ध महासभा यांच्या कडुन अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच शिव शक्ति मा व उच्च माध्यमिकचे मुख्याध्यापक विपिन जाधव सर व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.