
नांदेड| मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करून मराठा आरक्षण देण्यात यावा. या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात दिनांक 29 सप्टेंबर 2023 पासून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे समस्त महिला भगिनी व सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण करण्यात येत आहे.
सदरील साखळी उपोषण स्थळी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष तथा माजी आमदार अमर भाऊ राजूरकर, वरिष्ठ काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्षा सौ.डॉ.मीनल पाटील खतगावकर यांनी भेट दिली. यावेळी अशोक चव्हणनी उपोषणकर्त्यांशी आरक्षण संदर्भात चर्चा केली.
यावेळी सौ.डॉ.रेखाताई पाटील चव्हाण, सौ.जयश्री ताई पावडे,सौ.संगीताताई डक, विठ्ठल पावडे आदी जन उपस्थित होते. तर अनेक महिला भगिनी उपोषणकर्त्या म्हणून साखळी उपोषणामध्ये सहभागी झाल्या होत्या.
