हदगाव तालुक्यात जंगलातील वन्यजीवाची पिण्याच्या पाण्यासाठी लोकवस्तीकडे धाव…!
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव तालुक्यातील वन्यजीव प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे परंतु त्यांच्या पिण्याच्या पाण्याची जंगलात सोय दिसून येत नाही तसेच राष्ट्रीय महामार्गावर राज्य महामार्गावर या रोडवर जंगली प्राण्यांचा वावर आहे. अस बोर्ड लावण्याची आवश्यकता आहे. वन्यजीव शहर गावाकडे धाव घेत आहेत याचाच फायदा शिकारी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही वनपरिक्षेत्र विभागाने या बाबी कडे लक्ष देण्याची गरज आहे.
हदगाव तालुक्यातील जंगलात रोही डुक्कर हारीन आधी वन्य प्राण्यांची मोठी संख्या आहे. उन्हाळ्यात जंगलात कुठे जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पानवठे तयार केलेले आहे. या बाबतीत संबंधित विभागाकडून वारंवार विचारणा केल्या नंतर ही माहिती मिळत नाही. त्या मुळे वन्य प्राणी तहान भागवण्या करिता गावा व शहर कडे धाव घेत आहेत. गावाकडे धाव घेत असुन वन्यजीव शेती पिकांची नासाडी करीत असल्याचे दिसून येते आहे. उन्हाळ्यात वन्यजीव करिता पाण्याची सोय करण्यात आल्याचं वन विभागाकडून सांगण्यात येतं. पण नेमके पानवठे कुठे आहेत या बाबत काहीच माहिती देण्यात येत नाही.
वन विभागाकडून इतर उपाययोजना केलेल्या दिसतात काही ठिकाणी पाण्याची सोय करण्यात आली असं सांगण्यात येतं. परंतु प्रत्यक्षात स्थानिक तेथे काही दिसत नाही विशेष म्हणजे वनपरिक्षेत्र विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हदगाव च्या वनपरिक्षेत्रा कडे कमालीचे दुर्लक्ष केलेले आहे. परिणाम स्वरूप नेमकं या कार्यालया द्वारे शासनाच्या वन विभागा योजनांचा नेमका खर्च कुठे करण्यात येतो. या बाबतीत ही काहीच माहिती देण्यात येत नाही.
हदगाव तालुक्याच्या वनपरिक्षेत्र अधिकारी नेमके कोण आहेत हे सर्वसामान्य नागरिकांना माहिती नाहीये. आणखी विशेष म्हणजे हदगाव तालुक्यातील राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्गावर बाजूच्या जंगलातील तिथे वन्य प्राण्यांचा वावर असल्याने तेथे बोर्ड अध्यापही लावण्यात आलेले नाही. यामुळे भरधाव वाहने धावत असल्यामुळे वन्यजीवांचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.