श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। माहूर-किनवट तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या किनवट तालुक्यातील मोठी बाजार पेठ म्हणुन परिचीत असलेल्या सारखणी येथील फाजालानी किराणा अँड प्रोव्हिजनवर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत पाच टाक्या खाद्य तेल तर अनेक प्रकारचे खाद्य पदार्थ जप्त केल्याची चर्चा समोर येत असल्याने किनवट-माहुर तालुक्यात एकच खळ बळ निर्माण झाली आहे.
सवित्तर वृत्त असे कि,दि.५ जुलै रोजी सारखणी येथील फाजलानी प्रोव्हिजन अँड किराणा हि नेहमी प्रमाणे सकाळी ०९ ते १० वाजताच्या दरम्यान उघडली गेली,अशात तासाभरानंतर सुमारे सकाळी १० ते ११ वाजताच्या दरम्यान एम.एच १० सि.एक्स ९४५५ या क्रमांकाची पांढर्या रंगाच्या चार चाकी वाहनामधून तिन व्यक्ती सरळ फाजलानी यांच्या किराना दुकानमध्ये जावून आम्ही अन्न व औषध प्रशासनाचे अधीकारी असल्याचा परिचय देत तब्बल दोन तासापेक्षा अधीक काळ दुकानात थांबून बारकाईने चौकशी करत दुकानातील विविध प्रकारचे खाद्य पदार्थाची सामग्री सुद्धा जप्त केल्याचे वृत्त समोर आले असून संबधीत अधीकार्यांनी दुकानाबाहेर ठेवलेल्या खुल्या खाद्य तेलाच्या टाक्यामधुन नमुने घेवून पाच खाद्य तेलाच्या टाक्यांना सिल केल्याची माहिती समोर येत आहे.
सारखणी येथील फाजलानी प्रोव्हिजन अँड किराणा दुकानाचे आम्ही दि.५ जूलै रोजी सर्वेक्षण केले असून घेतलेल्या नमुन्यांचा विश्लेषण अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्नसुरक्षा अधिकारी सतिष हाके यांनी दिली आहे.
माहूर – किनवट तालुका हा अादीवासी व बंजारा बहूल भाग असून या भोळ्या भाबड्या लोकांचा फायदा घेत या दोन्ही तालुक्यात बेसळ युक्त खाद्य मालाची सर्रास विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी संबंधीत विभागाच्या टेबलावर धूळ खात पडल्या असल्यातरी आज पर्यंत या भागात अन्न व औषध प्रशासनाने कोणती ही कारवाई केली नाही.
त्यातच माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे अनेकाकडून भेसळयुक्त दुधाची हि मोठ्या प्रमाणात विक्री करुण नागरिकांच्या जिवाशी खेळल्या जात आहे.असे असतांना संबंधीत विभागाच्या अधिकार्यांने आज तगायत वाई बाजार येथे कारवाई करण्याचे धाडस दाखवले नसल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर संशय घेतला जात असून प्रत्येक महिण्याच्या शेवटच्या आठवड्यात वाई बाजार येथील एका किराणा दुकाणात बसून आपली रसद गोळा करुण घेवून जात असल्याची चर्चा देखील फाजलानी यांच्या किराणा दुकानावर झालेल्या कारवाईनंतर गाव-गावातील चावडीवर चर्चा रंगत आहे.