तेलंगवाडी येथे उष्माघाताचा पहीला बळी

उस्माननगर। येथुन जवळच असलेल्या तेलंगवाडी ता.कंधार.येथील मजुरदार अविनाश रामन पोकले वय ५२ ,हे शेतात काम करीत असताना उष्माघात होउन मृत्यु झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे.
मागील महिन्यापासून प्रचंड प्रमाणावर उष्णतेचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. दि.५ में रोजी अविनाश पोकले हे शेतात कडबा आवळण्याचे काम करीत होते. घरी आल्यावर लगेच त्यांनी पाणि पिले उन्हातुन येऊन लगेच पाणि पील्यामुळे उन्हाचा तडका बसला . उपचारासाठी दवाखान्यात नेले असता उष्माघाताने मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
त्यांचे मृत्यू पश्चात पत्नि दोनमुले,एक मुलगी , वडील असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.घरातला करता व्यक्ती अचानक गेल्या मुळे कुटुंब उघड्यावर पडले आहे. नांदेड जिल्ह्यात सध्या सूर्यदेव आग ओकत आहेत,उन्हाचा पारा जिवघेणा झाला आहे.त्यामुळे सर्वांनी कामापेक्षा जिवाची काळजी घेणे आवश्यक आहे.
उस्माननगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी मुख्यालय राहत असताना वेळेवर उपस्थित नसल्याने नागरिकांनी वैद्यकीय अधिकारी बद्दल नाराजी पसरली आहे.
