नांदेड। शहरातील शासकीय रुग्णालयात चोवीस तासात 24 जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे यात 12 नवजात बालकांचा समावेश आहे. तसेच दुसऱ्या दिवशी सुद्धा काही रुग्णांना आपला जीव गमवावा लागला.
झालेला हा सर्व प्रकार खूप दुःखद असून सर्व नांदेड ज़िल्हा तसेच सर्व राज्यामध्ये झालेल्या दुखत घटनेबद्दल दुःख व्यक्त केले जात आहे. तसेच हे सर्व रुग्ण गरीब कुटूंबातील असून शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत होते परंतु अचानक त्यांना आपला जीव गमवावा लागला. या सर्व रुग्नाचा मृत्यू होण्यामागचे कारणे शोधण्यासाठी झालेल्या प्रत्येक मृत्यू ची आपण सखोल चोकशी करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
मृत्यू पावलेल्या रुग्णांचा कुटूंबाला प्रत्येकी 10 लाखाची मदत राज्य सरकारच्या वतीने तातडीने जाहीर करावी. नांदेड शासकीय रुग्नालय मध्ये रिक्त असलेल्या सर्व जागी लवकरात लवकर नवीन भरती करावी .अश्या मागणीचे निवेदन वैदयकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कन्हैया कदम यांच्या वतीने देण्यात आले.