उस्माननगर,कंधार, माणिक भिसे| उस्माननगर ता.कंधार येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळे जवळील व सिध्देश्वर मंदिराच्या पाठीमागील स्मशानभूमी जवळील असे दोन देशी दारूचे दुकान एक वर्षं होऊन ही प्रशासनाने कोणत्येच ठोस पावलं उचलली नसल्याने येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते गंगाधर कांबळे यांनी दोन्ही दुकाने हाटविण्यात यावे यासाठी ग्रामपंचायत कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसले आहेत.
उस्माननगर ता.कंधार येथील दोन्ही देशी दारूचे दुकाने स्थलांतरित करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय यांनी विशेष ग्रामसभेचे आयोजन दि. २५ एप्रिल २०२३ रोजी करण्यात आले होते. यावेळी गावातील महिला पुरुष नागरिक, उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती कंधार यांनी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती.
ग्रामसभा सुरूवात झाली तेव्हा सर्वांनी दोन देशी दारूचे दुकान गावाच्या बाहेर स्थलांतर करण्यासाठी पिठसिन अधिकारी यांच्या कडे मागणी केली. यावेळी गांवकरी यांच्या मागणी पुढे हात उंचावून मतदान घेण्यात आले होते. उपस्थित सर्व ग्रामस्थांनी हात उंचावून एकमुखी ठराव घेण्यात आला. ग्रामसभेमध्ये उस्माननगर येथील दोन्ही देशी दारूचे दुकाने पाचशे मीटरच्या पुढे हटविण्यात यावे म्हणून सर्वानुमते एकमुखी ठराव घेण्यात आला.
मागील एक वर्षापासून येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य गंगाधर केरबा कांबळे हे शासनाकडे रितसर अर्ज देऊन दारू दुकान हाटविण्यासाठी मागणीचे निवेदन मागील तीन महीन्यापासून दिले होते. याकडे संबंधित अधिकारी व प्रशासन याकडे कानाडोळा करीत वेळ वाया घालवत असल्याचे लक्षात येताच दि. २५ मार्च रोजी पर्येत उस्माननगर येथील दोन्ही देशी दारूचे दुकाने स्थलांतरित न झाल्यास २७ मार्च २०२४ पासून उस्माननगर येथील ग्रामपंचायत कार्यालय समोर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.