नवीन नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांची रामतीर्थ पोलीस स्टेशन येथे बदली झाल्यामुळे सिडको पत्रकार, राजकीय पक्षाचे पदाधिकारी,विविध व्यापारी प्रतिष्ठान, मित्र मंडळ, यांच्या वतीने ढोल ताशा गजरात फुलांची उधळून करून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप याचीं बदली झाल्यामुळे २८ जानेवारी रोजी शिवम ईलेक्ट्रॉनिक सिडको येथे नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण देशमुख, माजी अध्यक्ष रमेश ठाकूर, दिंगाबर शिंदे, भाजपा शहर उपाध्यक्ष वैजनाथ देशमुख,शाम जाधव, छायाचित्र कार सारंग नेरलकर, सुर्यकांत यन्नवार, व्यापारी प्रतिष्ठानचे रमाकांत संगेवार, गजानन चंदेल, शुभम गोपीनवार,ओकांर नाईक, मोहन सिंग बावरी, पोहेकाॅ शिवसांब मठपती, पंढरी सोनटक्के ,परमेश्वर गायकवाड, बामणीकर, संदीप कदम, यांच्या सह सिडको परिसरातील विविध प्रतिष्ठानचे व्यापारी व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, मित्र मंडळ यांच्यी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.