नागपुर मडगाव प्रतिक्षा एक्स्प्रेसला ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ
नागपूर। नागपुर जं ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे खान्देश,विदर्भ ते कोकण चालणारी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत चालवली जाणार आहे. खान्देश,विदर्भातुन थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी उपलब्ध नसल्याने अशा रेल्वेची मागणी वारंवार रेल्वे प्रवासी संघटनांकडून केली जात होती नवरात्र,दिपावली व नाताळ पार्श्वभूमीवर ०११३९/०११४० नागपुर जं ते मडगाव ही आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी आता ३१डिसेंबर २०२३ पर्यंत चालवली जाणार आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपुर जं ते मडगाव (गोवा) पर्यंत चालवली जाणार आहे त्यानुसार ही गाडी नागपुर जं ते मडगाव (गोवा) पर्यंत चालवली जाणार आहे त्यानुसार ही गाडी नागपुर जं येथून दर बुधवार,शनिवारी दु.०३.०६ वाजता सुटून गुरुवार,रविवारी मडगाव गोवा दुसऱ्या दिवशी सायं ०५.४६ वाजता पोहोचेल
मडगाव गोवा ते नागपुर जं दरम्यान धावताना हि गाडी ०११४० गुरुवार,रविवारी मडगाव गोवा येथून रा.०७.०१ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ०९.३१ वाजता नागपुर जं येथे पोहोचेल.
नागपुर जं. ते मडगाव (गोवा) या प्रवासात गाडी वर्धा जं,पुलगाव, धामणगाव,बडनेरा जं,अकोला जं,मलकापूर,भुसावळ जं,नाशिक रोड,ईगतपुरी,कल्याण जं,पनवेल जं,रोहा,माणगांव, खेड,चिपळूण, संगमेश्वर रोड,रत्नागिरी,राजापूर रोड,कणकवली, कुडाळ,थिवीम, करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे या चार महिन्यांच्या कालावधीत या विशेष रेल्वेच्या दोन्ही बाजुच्या मिळुन ५२ फेऱ्या होणार आहेत या रेल्वेसेवेचे संगणकीय आरक्षण २४ सप्टेंबर २०२३ रोजी www.enquiry.indianrail.gov.in,www.irctc.gov.in व NTES ॲपवर भारतीय रेल्वेच्या आरक्षण खिडकीवर सुरु करण्यात येईल.
नागपुर जं मडगाव नागपुर जं प्रतिक्षा सुपरफास्ट बि-विकली एक्स्प्रेसचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष शेखर नागपाल,कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समिती मुंबई संस्थापक अध्यक्ष सुनिल उत्तेकर,पुणे कल्याण मार्गे सावंतवाडी रेल्वे प्रवासी समिती मुंबई संस्थापक अध्यक्ष यशवंत परब,राष्ट्रीय रेल्वे सल्लागार समिती शेगांव सल्लागार व सदस्य ॲड.श्री.पुरुषोत्तम डांगरा,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष राजकुमार व्यास,राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना राष्ट्रीय अध्यक्षा डाॅ.सौ.शबनम शेख,सौ माधुरी शर्मा,राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले,राष्ट्रीय संघटनमंत्री ओमकार उमाजी माळगांवकर, संपर्कप्रमुख हर्षद भगत,कुडाळ व ठाणे तालुकाध्यक्ष चैतन्य धुरी,विदर्भ-खान्देश विद्यापीठ-कॉलेजातील विद्यार्थी-विद्यार्थीनी, प्रवासीवर्गाकडून करण्यात आले आहे.