कृषी

केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी ३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई| प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत फळ पीक विमा योजनेत केळी पिकाचा विमा भरण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना ३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत हवामान आधारित फळ पीक विमा योजनेमध्ये केळी या पिकाचा विमा भरण्यास ३१ ऑक्टोबर २०२३ अंतिम मुदत देण्यात आली होती. ३१ ऑक्टोबर पर्यंत सुमारे ४५ हजार ७३१ अर्जदारांनी केळी पिकासाठी विमा योजनेत सहभाग घेतला होता. तांत्रिक अडचणींमुळे काही केळी उत्पादक शेतकरी या योजनेत ठराविक वेळेत सहभागी होऊ शकले नव्हते. त्यामुळे मंत्री श्री. मुंडे यांनी केंद्राकडे मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती.

मंत्री श्री. मुंडे यांची ही विनंती मान्य करण्यात आली असून, ३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मंत्री श्री. मुंडे यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेतील सहभाग वाढवून आपला विमा निर्धारित वेळेत भरून घ्यावा, असे आवाहनही केले आहे.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!