पळसपानांच्या पत्रावळी जेवणाच्या पंगतीतून हद्दपार
उस्माननगर, माणिक भिसे। पळसांच्या पानांना कीड लागत नसून या पत्रावळी स्वस्त सहज उपलब्ध होत्या.पूर्वी एखाद्या कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांना ताटात जेवण न. देता पत्रावळीत सामुदायिक जेवण दिले जायचे. विवाह सोहळ्यात व सप्ताह, पूजा व इतर कार्यक्रमात जेवणासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पळस पानांच्या पत्रावळी सध्याच्या काळात हद्दपार झाल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.
तर आधुनिकीकरणाच्या युगात प्लास्टिक व थर्माकोलच्या पत्रावळीना आधिक पसंती मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.विवाह सोहळ्यात व इतर सार्वजनिक कार्यक्रमात आता पळसांच्या पानांच्या पत्रावळीची जागा थर्माकोल व प्लास्टिक पत्रावळीने घेतली आहे.त्यामुळे स्थानिकांच्या पत्रावळी तयार करणे व पळसाची पाने जंगलातून आणून व्यापार्यांना…..विकणे हा छोटे खाणी रोजगार मागणी कमी होत असल्याने बंद झाला आहे. सध्या आधुनिकीकरणाच्या युगात ग्रामस्थ पळसांच्या पानां ऐवजी प्लास्टिक किंवा थर्माकोलच्या पत्रावळ्याचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहेत.परिणामी स्वतः आयुर्वेदिक महत्त्व असणार्या पळसांच्या पानांची पत्रावळी हद्दपार झालेली पाहावयास मिळत आहे..
पळस पानांच्या पत्रावळीत जेवणाचा आस्वाद वेगळाच……
पळसांच्या पानांनी बनवलेल्या स्वादच अलग असायचा असे जुने जानकार वयोवृद्ध नागरिक आजही अभिमानाने सांगत आहेत.कारण पळसांच्या पत्रावळीला आयुर्वेदिक गुणधर्म असल्याने जेवण लवकर पचते अशी विविध गुणधर्म असलेली पळसांच्या पानांची पत्रावळी सध्याच्या स्थितीत हद्दपार झालेली असून,तीची जागा थर्माकोल व प्लास्टिक पत्रावळीने घेतली असल्यास दिसत आहे.
रोजगाराचे साधन बंध पडले…
पुरातन काळापासून मंगल प्रसंगी जेवण समारंभासाठी पळसांच्या पानापासून बनवलेल्या पत्रावळीचा वापर केला जात असे.आयुर्विदीक गुणधर्म असलेल्या पत्रावळी लोपपावत असून,त्यांची जागा थर्माकोल व प्लास्टिक पत्रावळीने घेतल्याने व्यावसायिकांचे रोजगार साधन बंध पडले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे…