शिक्षक या शब्दाचा अर्थ ज्यांच्याकडे पाहिल्यावर पूर्ण होतो असे शिस्तप्रिय,सयमी ,प्रेमळ , कष्टाळु , मेहनती , जिद्द उराशी बाळगून , क्षमताधिष्टीत कर्तव्यनिष्ठ गुरुजी म्हणजे विश्वासराव लोखंडे गुरुजी, स्वतःच्या कर्तृतवावर अढळनिष्ठा प्रमाणिक असलेल्या व्यक्तीच समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण करु शकतात. सर्व सामान्य कुटूंबात जन्मलेल्या, आर्थिक विवंचना असतानाही शालेय जीवनातच गुरुजी होवून विद्यादानाचे महतकार्य करण्याचे धैर्य, स्वप्न साकारणाऱ्या श्री विश्वासराव विठ्ठलराव लोखंडे गुरुजींचे विद्यार्थ्याशी असलेले अतूट नाते त्यांच्याशी एकरुप होण ,एक अनुकरणीय उदाहरण ठरावे …. गुरुजी अमृत महोत्सवी वर्ष पूर्ण करतांना केवळ कार्याने विद्यार्थी , पालक याच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे सर्वस्पर्शी मनमिळाऊ स्वभावाचे आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.
विदर्भातील पुसद येथे 15 ऑगस्ट 1942 ला जन्मलेल्या गुरुजींचे प्राथमिक शिक्षण उमरखेड तालुक्यातील विडूळ येथे तर माध्यमिक शिक्षण उमरखेडच्या साकळे विद्यालयात झाले. दहावीत दूसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुरुजींच्या कुटूंबाची आर्थिक स्थिती बेताचीच असल्याने शालेय शिक्षण घेताना श्रीराम टॉकीज येथे चित्रपटाचे बोर्ड रंगवून 15 रुपये वेतनावर काम केले ….. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आचार्य अत्रे लिखीत “शामची आई ” हा चित्रपट विद्यार्थी दशेत असताना …गुरुजींनी तिन वेळा चित्रपट पाहून त्यांच्या मनात मोठेपणी आपण सुद्धा गुरुजी होण्याचा निश्चय केला. बालवयापासून चित्रकला हा छंद जोपासत वर्गमित्र के. ए. आर. कुरमे संपादक असलेले साकळे विद्यालयाचे ज्योती हस्तलिखीत सजावट केली. हालाखीच्या परिस्थितीमुळे तिन रुपये खोली भाडे देवून चार वर्ग मित्रांसोबत स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून शिक्षण घेतलेल्या गुरुजींनी सानेगुरुजींच्या ” शामची आई ” मधील …. यतीकी पती स्वर्गीय ठेवा …..या पूस्तकांचे वाचन केल्यामुळे बालकांच्या सानिध्यात रमून शिक्षण देण्याचे संकल्प.
1964 ला नांदेड जिल्यातील कंधार तालुक्यात शिक्षणाचे संस्कार केंद्र म्हणून ओळखल्या जाणान्या उस्माननगर येथे शिक्षक म्हणून प्रथम नेमणूक झालेल्या गुरुजीनी विद्यादानाला सुरुवात केली. त्यानंतर भूत्याची वाडी या गावी पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या शाळेची सुरुवात गुरुजींच्या पहिल्या वर्गातील शिकवणीने सुरु झाली ….. गुरुजींच्या अंगी असलेला चित्रकलेचा छंद ….शाळा बोलकी करण्यास उपयोगी पडली… शालेय विद्यार्थ्यात सुप्त असलेल्या कला सृजन या बाबींना उत्साहित करण्यासाठी लोखंडे गुरुजी बालकात स्वता: ला एकरुप होवून ….कार्यमग्न होऊन विद्यार्थ्यांना विद्यादानाचे धडे देत होते . कंधार तालुका हाच सेवा निवृत्त होईपर्यंत कर्मभूमी ठरला 28 वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत असतांना स्वतःची शाळा…. वर्ग विद्यार्थी यातच रममान होणारे गुरुजी….. एकदाही दिर्घ रजा उपभोगली नाही….. दैनंदीन टाचण काढून अध्यापन करणे…., शाळेच्या वेळेअगोदर तासभर तर शाळा सुटल्यानंतर तासभर मुलांसमवेत शाळेतच राहायचे …..शालेय तपासणीस आलेल्या विविध अधिकाऱ्यांच्या कौतुकाच्या शेऱ्यानेच सर्व्हिस बुक गुरुजींची कामावरील निष्ठा दर्शविते…. उस्माननगर येथे शाळेत असतांना शिक्षक व विद्यार्थ्यांचा समावेश असलेले आचार्य लिखीत संगीत गुरु दक्षिणा हे नाटक सादरीकरण, दिग्दर्शन रंगभूषा, वेशभूषा यात लोखंडे गुरुजींनी मन ओतून विद्यार्थ्यांच्या कला आविष्काराला उत्तेजन दिले.
त्रिशत सांवत्सरिक छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळयासाठी महाराजांचे चित्ररूप प्रदर्शन, शिवदर्शन, बालचित्र प्रदर्शन, हस्तकला प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात लोखंडे गुरुजींचा कलेसाठी महत्त्वाचा वाटा असायचा…. तत्कालीन जिल्हाधिकारी श्री भडकमकर यांनी विद्यार्थी हस्तलिखीत “अंकुर” चे प्रकाशन करण्यात आले. गुरुजींच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिराढोण येथे कार्यरत असतांना तालुकास्तरीय शिक्षक संम्मेलनात चित्र, विज्ञान प्रदर्शन यासोबत शालेय विद्याथ्र्यांच्या हस्तलिखीत “कलिका” चे प्रकाशन जेष्ठ विचारवंत साहित्यीक के. नरहर कुरुंदकर यांच्याहस्ते करण्यात आले. अंकातील रंग सजावट आकर्षक मांडणी विद्यार्थ्यांचे साहित्य मांडणी ….आणि सुरेख साकारलेल्या जाहिराती ….पाहून कुरुंदकर कौतुकाने भारावले.
स्वतःला शिक्षण क्षेत्रात स्वता:ला वाहून घेतलेल्या गुरुजींनी विद्यार्थी अभ्यासू घडला पाहिजे.अभ्यासात पुढे गेला पाहिजे.अशी तळमळ गुरुजी मध्ये असायाची , कोणाही समोर उभे राहून त्यांना उत्स्फुर्त संवाद साधता यावा. विचाराचे व वैचारिक मंथन करता यावे . त्याकाळात गाड्या नव्हत्या ,. गुरुजी सकाळी एक ते दिड तास अगोदर घराच्या बाहेर पडायचे .पायाने चालत शाळेला वेळेवर हजर व्हायाचे. एक शिस्त प्रिय शिक्षक म्हणून नोकरी केली.
गुरूजींनी शिराढोण येथे दर शनिवारी सानेगुरुजी कथामाला अनेक वर्ष चालवली ..विद्यार्थी आणि पालक व गुरुजी…. यांचे अतुट मायेचे नाते….. निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळांची माहिती मिळत होती .यासाठी शैक्षणीक सहलीचे आयोजन करुन ते शिवनेरी, सिंहगड या किल्याबरोबरच शनिवारवाडा या ठिकाणची माहिती देण्याबरोबर शिल्पकलेसाठी जागतिक आश्चर्यात समाविष्ठ असलेल्या वेरुळ, अजिंठा येथे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटीने कुतूहल जागृत केले. पैठणची पैठणी, नाथसागर, औरंगाबाद येथील आकाशवाणी केंद्र, विमानतळ , बीबीका मकबरा ही स्थळे पाहण्याचा योग विद्यार्थ्यांना मिळवून दिला.
राष्ट्रीय कार्यात गुरुजींनी साक्षरता अभियानमध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी सुधीरकुमार गोयल यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र मिळवून उत्कृष्ट कार्य केले. गुरुजींनी घेतलेला 56 नव साक्षरांचा वर्गा पैकी 47 साक्षर तर 4थी बोर्ड परीक्षेत 12 नव साक्षर उत्तीणं यामुळे गुरुजी गौरवास पात्र ठरले. वृक्षारोपन, वृक्षसंवर्धन, कुटूंबनियोजन या कामाबरोबरच तिन वेळेस केलेल्या जनगणनेच्या उत्कृष्ठ कामाचे प्रमाणपत्र देवून तहसिलदाराने सन्मानीत केले.
ज्या काळात संपर्क, प्रवास, साधने यावर मर्यादा होत्या त्या काळात जेथे जातो तेथे वर्ग, शाळा बोलक्या केल्या स्वतःच्या कला गुणांना शिक्षण क्षेत्रात समाविष्ठ करुन ” ही आवडते मज .. मनापासूनी शाळा लाविते लळा ….” ही जसे माऊली बाळा…. या ब्रिद उक्ती बरोबर कृतीने गुरुजींनी प्रत्यक्षात साकारुन दाखविले, वेळ, पैसा, शक्ति विद्यार्थी माझे दैवत म्हणत प्रत्येक विद्यार्थी अष्टपैलु हिऱ्याप्रमाणे घडविता येवू शकतो. रात्रंदिवस शिक्षणातील अभिनव प्रयोगाद्वारे मुल रसिक, कलावंत, सृजन होण्याबरोबर तो सुसंस्कृत नागरिक म्हणून ओळखला जावा यासाठी आळस हा शब्द वर्ज्य करुन कुणाच्या मागे किंवा कुणाच्या पूढे न करता नितळ अंतकरणाने करी मनोरंजन जो मुलांचे जडील नाते प्रभुंशी तयांचे…. या ओळीप्रमाणे वर्ग देवघर, शाळा पवित्र मंदिर, तर विद्यार्थी हे प्रत्यक्षात देवत समजुन त्यांच्याशी एकरूप होत विद्यादानाचे कार्य करणाऱ्या गुरुच्या कार्याची दखल घेवून १९८९ ला तालुकास्तरीय उत्कृष्ट शिक्षक…. तर १९९४ -९५मध्ये जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
उस्माननगर येथील होसी नाट्य कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी गुरुजींनी “इच्छा माझी पूरी करा, ” …गाढवाच लग्न ….या नाटकांसाठी तरुण कलावंतांना रंगभूषा वेशभूषासाठी सहकार्य व मार्गदर्शन नेहमी लाभायाचे ..त्याकाळी गावात गणेशोत्सव दरम्यान अक्षर गणेश मंडळासाठी आकर्षक सजावट करण्यासाठी जीव ओतून काम करत होते.गणेश उत्सव दरम्यान लहान लहान मुला ,मुलींना
शिवमंदिर गणेश मंडळासाठी शंकर पार्वती बालकलाकार जिवंत देखावे सादर करण्यात पुढाकार घेतला. बोल्हाई प्रतिष्ठाण चे सांस्कृतीक व सामाजिक कार्य त्यांच्याच कल्पक कल्पनेतून उपक्रमांच्या आखणीतून चालते, स्वतःच्या घरी मोठया वृक्षांचे संगोपन करून गुरुजींनी वृक्ष लावून व जगवून एक आगळे उदाहरण निर्माण केले आहे. गुरुजीच्या हया प्रेरणादायी व अनुकरणीय कार्याची गरज आजच्या काळातही महत्त्वाची भूमिका बजावते. त्यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्यातून त्यांच्यासारखा उत्साह व कार्याबदलची तळमळ आमच्यासाठी निश्चितच अनुकरणीय आहे. त्यांना जो जीवन गौरव पुरस्कार प्राप्त होत आहे खरोखरच विद्यार्थ्यावर प्रेम , आपुलकी , जिव्हाळा , आत्मियता, रूजविणारे गुरुजी होय . त्यांच्या भावी आयुष्यास निरोगी व दिर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना…….!
लेखक ……माणिक अंबादास भिसे, उस्माननगर ता.कंधार