ओळखपत्र तपासून तसेच टिळा लावूनच गरबा मंडळात प्रवेश दिला जावा – विहिंप मातृशक्ती
नांदेड। नवरात्र हा हिंदूंचा धार्मिक उत्सव असून दुर्गा मातेची भक्ती भक्तांकडून केली जाते. गरबा व दांडियाच्या माध्यमातून दुर्गामातेची आराधना केली जाते परंतु काही लोक या गरबा दांडियाला व्यावसायिक स्वरूप दिले जात आहे.
याठिकाणी ना देवीची मूर्ती असते ना भक्ती , काही ठिकाणी विक्षित्प प्रकारचे कपडे परिधान करून युवक – युवती येत असतात तसेच या ठिकाणी गैर हिंदूंकडून हिंदू मुलींच्या छेडछाडीचे प्रकार घडत असल्या कारणाने गरबा पंडालात प्रवेश देताना ओळखपत्र तपासून तसेच कपाळावर टिळा लावूनच प्रवेश द्यावा अशी मागणी तथा सूचना विश्व हिंदू परिषद, मातृशक्ती, दुर्गावाहिनी तथा बजरंग दलातर्फे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच जिल्ह्यातील सर्व गरबा व दांडिया आयोजकांना करण्यात आली आहे.
यावेळी विश्व हिंदू परिषद मातृशक्तीच्या संजीवनी देशपांडे, माला शर्मा, पूजा बिसेन, संध्या छापरवाल, सविता शर्मा, चंदा जाजू, अनुराधा वैजवाडे, मंजुषा देशपांडे, शशिकांत पाटील, गजानन पांचाळ, गणेश यशवंतकर,आकाश कापकर, वैभव दरबस्तवार, अक्षय ठाकूर आदी उपस्थित होते.