नायगाव, रामप्रसाद चन्नावार। धुपा तालुका नायगाव येथील भाजपचे नायगाव तालुका सरचिटणीस म्हणून पक्षाचे एकनिष्ठ काम करणारे धुपा तालुका नायगाव येथील अवकाश पाटील धुपेकर यांची नादेड जिल्हा दुरसंचार सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
नांदेड येथे भाजप शहर व ग्रामीण दक्षिन जिल्हा नादेड भाजपा ची गाव चलो अभियान संघटनात्मक कार्यशाळा संपन्न झाली या बैठकिमध्ये नादेड जिल्हा दुरसंचार सल्लागार समितीचे सदस्य म्हणून ग्रामीण भागातून पक्षासाठी एक निष्ठ राहून काम करणारे नायगाव तालुका सरचिटणीस अवकाश पाटील यांची निवड करण्यात आली.
त्यांच्या या निवडीचे पक्षाच्या वतीने आमदार राम पाटिल रातोळीकर यांनी अवकाश पाटील यांचा सत्कार करून स्वागत केले यावेळी मराठवाडा संघटन मंत्री संजयभाऊ कोडगे, जिल्हाअध्यक्ष संतुकराव हंबर्डे, महानगर अध्यक्ष दिलीपराव कंदकुर्ते, मा. आमदार सुभाषराव साबने, प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. अजित गोपछडे, मा. अध्यक्ष व्यकटराव पा. गोजेगावकर, प्रविनभाऊ साले, चैतन्यबापु देशमुख, लक्षुमणराव ठक्करवाड, मिलिंद देशमुख, मानिकराव लोहगावे, दत्ता पाटिल ढगे, विजय पाटिल डांगे, चक्रेश पाटिल, परमेश्वर पाटिल. व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, महानगर पदाधिकारी उपस्थित होते.
अवकाश पाटील धुपेकर यांच्या या निवडीचे भाजपा नेते, कार्यकर्ते यासह अनेक मित्र परिवाराकडून अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या या पुढील कार्यास अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.