माहूर, इलियास बावानी| हिंदु-मुस्लिम ऐक्य, बंधूभाव कायम राहावा आणि विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचे विघ्न निर्माण होऊ नये यासाठी १० सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादची मिरवणूक काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय माहूर मुस्लिम समाजाने घेतला आहे.मुस्लिम समाज बांधवांकडून माहूर पोलिस ठाण्यात या संदर्भात दिनांक २७ रोजी निवेदन देत हा स्वागतार्ह निर्णय घेण्यात आला आहे.

माहूर शहरातील सामाजिक एकता बंधुत्व आणि प्रेम,शांतता, सौहार्द,बंधुता,सामाजिक सलोखा, देशभक्ती, एकता,अखंडता, सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी हा अभिनंदनीय निर्णय असल्याचे मत नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी व्यक्त केले

यंदा श्री गणेश विसर्जन मिरवणूक आणि मुस्लिम बांधवांची ईद-ए-मिलाद मिरवणूक एकाच वेळी असल्याने गणेश विसर्जन मिरवणूकीत कोणत्याही प्रकारचे विघ्न न येता पार पडावी या उद्देशाने १० सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादची मिरवणूक काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय माहूर शहरातील मिलाद समिती व मुस्लिम समाजाने मुस्लिम बांधवाच्या बैठकीत चर्चा करून सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. नगराध्यक्ष फिरोज दोसानी, गौसिया मस्जिद चे सदर जमीर मलनस,नगर सेवक प्रतिनिधी इरफान सय्यद, इरशाद रजा, बबलू शेख,इस्माईल काझी,इलियास बावानी, अब्दुल रहमान शेख आली.

यांच्या कडून १० सप्टेंबर रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिस ठाणयात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.मुस्लिम समाजाच्या या निर्णयाचे पोलिस निरीक्षक गणेश कराड यांनी स्वागत केले आहे. इस्लामचे शेवटचे पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त मुस्लिम बांधव ‘ईद-ए-मिलाद’ मोठ्या उत्साहात साजरी करतात. त्या दिवशी मिरवणूक काढली जाते. तथापि, गणेश विसर्जनात कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून माहूर शहर मुस्लिम संघटनांनी ईद मिलाद-उन-नबीची मिरवणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
