पांढरेशुभ्र दाट धुक्यामुळे लोहा तालुक्यातील मौजे जोमेगाव जवळील तलावात उतरली
नांदेड| शहरासह जिल्ह्यात मागीलदोन ते तीन दिवसांपासून पहाटे पांढरेशुभ्र दाट धुके पडत आहे. यामुळे शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास नांदेड डेपोची लाडका जाणारी भरधाव वेगातील बस क्रमांक एमएच ७ सी ७२४३ एस टी महामंडळाची हि बसगाडी लोहा तालुक्यातील मौजे जोमेगाव जवळील एका तलावात उतरली. दरम्यान चालक एम. ई. सोनकांबळे व वाहक बी. एम.कापसीकर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने बसवर नियंत्रण मिळवता आले. १२ फूट खोल खड्ड्यात जाणारी बस थांबवण्यात आली.
नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासूनअवकाळी पाऊस होत आहे. याचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसला आहे. ढगाळ वातावरण आणि दाट धुक्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात दृश्यमानता कमी झाली आहे. परिणामी शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास नांदेड डेपोची लाडका जाणारी भरधाव वेगातील एस टी महामंडळाची बस क्रमांक एमएच ७ सी ७२४३ लोहा तालुक्यातील मौजे जोमेगाव जवळील एका तलावात उतरली. या बसमधील १२ प्रवासी बालंबाल बचावले असून, यातलावात गाळ उपसा झाला होता. त्यामुळे तलाव १४ फुटांपर्यंत खोल झाला आहे. या धुक्याच्या वातावरणामुळे पिकांवरही विपरीत परिणाम होत आहे. तुरीची फुलगळ होत आहे तर हरभऱ्यावर मर रोगांचा प्रादुर्भाव वाढलं आहे, पुढील आठवडा असेच वातावरण राहणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
किमान तापमान २ ते ३ अंश सेल्सियसने घटणार
दरम्यान, प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहील. ९ व १० डिसेंबरला आकाश अंशत: ढगाळराहण्याची शक्यता आहे. पुढीलकाही दिवस किमान तापमानात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सियसने घट होण्याची शक्यता आहे, असे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मोसम विभागाने कळवले आहे.