हिमायतनगर| कौठा तांडा ते वाडी, एकंबा या भागातील शेतकऱ्यांना उस कारखान्याला घेऊन जाता ऐत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी युवा सेनेचे विशाल राठोड यांना कळवताच त्यांनी तातडीने जेसीबीच्या साहाय्याने खड्डे बुजवून रस्ता मोकळा करून दिल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्या कार्य तत्परतेचे कौतुक करत आभार मानले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी पांदन रस्त्याची गरज आहे. परंतु याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील माल वाहतूक करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. कौठा तांडा, कौठा वाडी. एकंबा, सेलोडा या भागातील शेतकऱ्यांना उस कारखान्याला घेऊन जाण्यासाठी रस्त्यावर खड्डे पडले होते .त्यामुळे ट्रक्टर पलटी होण्याची शक्यता असल्याने सदरील रस्ता दुरूस्ती करून देण्याची मागणी शिवसेनेचे विशाल राठोड यांच्या कडे कौठा येथील शेतकरी नागरीकांनी केली होती.
शेतकऱ्यांना ऊस दुष्काळी फाटा मार्गे न्यावा लागत आहे. परंतु सिरंजनी मार्गे ते आयटीआय रस्ता अतिवृष्टी च्या पावसामुळे अतिशय खड्डे मय बनला होता. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन सदरील रस्त्यावरील खड्डे बुजवून उसाच्या गाड्या जाण्यासाठी जेसीबी द्वारे रस्ता तयार करून दिला. युवा सेनेचे विशाल राठोड यांनी तात्काळ रस्त्याची समस्या दूर करून शेतकऱ्यांचा जिकरीचे प्रश्न सोडवला आहे. त्यांच्या सामाजिक कामाचे शेतकऱ्यांनी कौतुक करत आभार मानले आहे. ग्रामीण भागात युवा सेनेचे विशाल राठोड यांचा जनसंपर्क दांडगा संपर्क आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या भागाला विशाल राठोड यांच्या सारख्या नेतृत्वाची गरज असल्याचे कौठा येथील उपसरपंच आदित्य राठोड यांच्यासह कौठा तांडा येथील शेतकऱ्यांनी दैनिक गांवकरीशी बोलताना सांगितले.