हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर येथील हिंदू स्मशान भूमी दुर्लक्षित झाली होती. हि बाब लक्षात घेऊन येथील युवकांनी समिती तयार करून लकडोबा चौकातील वैकुंठधाम स्मशानभूमीचा कायापालट करण्याचा ध्यास घेतला. कोणत्याही राजकीय नेत्यांची वाट न पाहता समितीने श्रमदान करून दर रविवारी स्मशान भूमीतील केर कचरा साफ करून स्वर्गासारखी स्मशान भूमी बनविण्याचा संकल्प केला आहे. हि गोष्ठ वाखाणण्याजोगी असून, या समितीतील युवकांचे मी मनापासून कौतुक करतो. नक्कीच या स्मशानभूमीच स्वर्गात रूपांतर होऊन प्रेताची मृत्यूनंतरची होणारी अवहेलना थांबनार आहे अश्या शब्दात हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी स्मशान भूमी विकास समितीचे कौतुक केले.
येथील लकडोबा चौकातील स्मशान भूमीत झाडी झुडपे वाढून तसेच मातीचे ढिगारे व मोठं मोठ्या टोळके दगडांमुळे दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे निधन झालेल्यांच्या अंत्यविधीला आल्यानंतर ये – जा करताना निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन प्रेताची मृत्यूनंतरची अवहेलना थांबावी यासाठी शहरातील युवकांनी संकल्प करून वैकुंठधाम स्मशानभूमीत श्रमदान करण्याचा कार्यक्रम दर रविवारी अविरत सुरू ठेवला आहे. युवकांकडून राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमाची माहिती मिळताच हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी शुक्रवारी हिमायतनगर येथे भेट देऊन स्मशान भूमीची पाहणी करून समितीने पुढाकार घेऊन केलेल्या कामाचे कौतुक केले. एव्हडेच नाहीतर तर स्मशान भूमीत उन्हाळयात व पावसाळयात रस्त्याची अडचण येणार नाही यासाठी तात्काळ सिमेंट काँक्रेटचा रस्ता मंजूर करून त्याचे नारळ देखील फोडले आहे. आणि लागलीच नगरपंचायत अभियंत्यास मेजरमेंट घेऊन काम सुरु करण्याच्या सूचना दिल्या तसेच स्मशान भूमीत 16 हाय पॉवरचे फोकस बसविण्यात यावेत अश्या सूचना प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल यांना केल्या.
यापूर्वी आमदार महोदयांनी नगरपंचायतची सत्ता काँगेसच्या ताब्यात असताना येथील व शहरातील सर्वच स्मशान भूमीला लाखोंचा निधी देऊन कंपाउंड भिंत, दहानिका, शेड यासह येथे बोअर देखील करून दिला आहे. त्यामुळे समितीच्या वतीने आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचं स्वागत करून आभार मानले आहे. यावेळी प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल भाई, ज्ञानेश्वर शिंदे, गणेशराव शिंदे, डॉ.राजेंद्र वानखेडे, श्याम ढगे, वामनराव मिराशे, परमेश्वर तिप्पनवार, शिवाजी पाटील सिरपल्लीकर, विलास वानखेडे, लक्ष्मण डांगे, राम जाधव, अब्दुल बाखी सेठ, संजय माने, राजदत्त सूर्यवंशी, श्रीकांत घुंगरे, पंडित ढोणे आदींसह स्मशान भूमी विकास समितीचे सदस्य व अन्य नागरिक उपस्थित होते.