हंडरगुळी/उदगीर/लातूर, विठ्ठल पाटील| हाळी व हंडरगुळी ता.उदगीर येथे गत कांही दिवसापासुन “ना—बालक बनले चालक” या मथळ्याखाली न्यूजफ्लॅश३६०.इन या वृत्तवाहिनीवर बातमी प्रकाशीत झाली होती. याच बातमीची दखल जनहित दक्ष सपोनी.भिमराव गायकवाड तसेच दबंग हे.काॅ.संजय दळवे पाटील यांनी घेतली. आणि हाळी,हंडरगुळी येथे 2 चाकी वाहनांची तपासणी मोहिम सुरु केली असुन, यात डंक & ड्राईव्ह करने नंबर नसने, मोबाईलवर बोलने तसेच फटाका सायलेंन्सर लावणे, लायसंन्स नसणे, यासारख्या कारणांवरुन दोन चाकी गाड्यांची धरपकड केली आहे.
यावेळी मिसुरडंही न फुटलेल्या पोरांनी लहान-मोठे वाहन चालवताना आढळल्यास प्रथम 5 हजार दंड होऊ शकतो.किंवा दंडासह पालकांना जेल “ससुराल” ची हवा पण खावे लागु शकते.तेंव्हा पालकांनो कायदा पाळा अन्यथा पोलिस कोठडी ( ससुराल ) मध्ये जाण्याची तयारी ठेवा. असे मत जनहितदक्ष A.p.i.भिमराव गायकवाड व पोहेकाॅ.संजय दळवे यांनी परवा शांतता कमिटीच्या मिटींगमध्ये बोलत असताना व्यक्त केले. तसेच जमादार संजय दळवे यांनी सुरु केलेली मोहिम चालूच ठेवावी.जेणेकरुन या दरम्यान चोरीच्या गाड्या सापडू शकतात. असे स्पष्ट मत पञकार संघाचे अध्यक्ष पप्पु पाटील यांनी व्यक्त केले.
तसेच कायदा पायदळी तुडवत सुसाट , धूम स्टाईल पळवणा-या बाईकस्वारांवर नियमानुसार कारवाई करा.कुणी पण “मध्यस्ती” केली तर सोडू नका.असे हाळीचे उपसरपंच राजू पाटील, युवा सेना लातुर जिल्हा सरचिटणीस रमण माने,जंटू माने यांनी परखड मत व्यक्त केले.तसेच मोटारसायकल धरपकड ही मोहिम राबवत असल्याने सामान्य जनतेतुन पोलिसांच्या धैर्याचे कौतूक व समाधान व्यक्त होत आहे.तसेच ही मोहीम चालुच ठेवावी म्हणजे चोरीचे बाईक्स सापडू शकतात.व पालकांना ही बालकांना गाडी दिल्यावर कोणती सजा मिळते.हे पण कळू शकते.सध्या हाळीहंडरगुळी येथे मिसुरडं ही नाही असे शेकडो पोरं दुचाकीसह ट्रॅक्टरही चालवताना दिसतात.तेंव्हा पालकांनो वाहतुक कायद्याचे पालन करा.आणि विनानंबर,विनालायसंन्स,विना कागद पञ,तसेच फोनवर बोलताना वाहन चालवाल तर “ससुराल” बोले तो पोलीस कोठडीची हवा खाल.असा इषारा पोलिसांनी दिला आहे.
तसेच पोलिसांनी नियम मोडणा-या बाईक्स चालकांसह ट्रॅक्टर चालकांवर तसेच वाहतुकीस अडथळा व अपघातास कारण ठरणा-या हातगाड्यांसह सा. बां.खात्यानी बनवलेल्या नालीवर व पुढे अतिक्रमण करुन अपघातास कारण ठरु पाहणा-यांवर नियमां प्रमाणे कारवाही करावी.अशी मागणी हाळीहंडरगुळीकरां तर्फे पञकार पप्पु पाटील यांनी शांतता समितीच्या बैठकी मध्ये केले.तेंव्हा लवकरच या सर्वांवर कारवाई करा.असा आदेश जनहितदक्ष Api.भिमराव गायकवाड यांनी हंडरगुळीच्या पोलिसांना दिले.व लवकरच याकडे लक्ष देऊन नियमाने कारवाई करणार.असा शब्द शांतता कमिटीस उपस्थित मान्यवरांना दबंग जमादार संजय दळवे यांनी दिला आहे.