जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन सोहळ्याची एक मेकावर पूष्पवृष्टी नंतर राष्ट्रगीतानी सांगता-डॉ.हंसराज वैद्य
नांदेड। औचित्त होते जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन सोहळा साजरा करण्याचा सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ वजिराबादच्या पुढाकाराने ज्येष्ठ नागरिक संघ वजिराबाद, ज्येष्ठ नागरिक संघ चौफाळा,सिडको, कौठा तथा नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीच्या वतिने ज्येष्ठ नागरिक दिन सोहळा एका अगळ्या वेगळ्या तथा रंगा ढंगाने साजरा करण्यात आला.
सत्कार मूर्ती सर्वश्री मा.पंचान्नव वर्षिय बनारशी दासजी अग्रवाल साहेब (ख्यातकिर्त उद्योगपती तथा सर्व परिचित दानशूर व्यक्तीमत्व), माजी प्राचार्य ह.भ.प.सु.ग.चव्हाण साहेब(विद्यार्थी प्रिय व ख्यातकिर्त किर्तन कार तथा प्रवचण कार), सुभाष रावजी बार्हाळे(सर्व ज्येष्ठ नागरिक संघांचे व चळवळीचे मार्गदर्शक तथा आधारवड), सौ.निर्मला आई सुभाषराव बार्हाळे(नांदेड मधील ज्येष्ठ महिला चळवळीच्या महामेरू), एस एन अंबेकर साहेब(एझड 95 संघटणेचे राज्याध्यक्ष तथा संघटणेची बुलंद तोफ), दत्तोपंतजी डहाळे साहेब(संत पाचले गांवकर प्रतिस्ठांणचे निर्माते व महाराजांचे आवडते पट शिष्य), लातूरहून या सोहळ्यास खास उपस्थित असलेले लातूर जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी जिल्हाध्यक्ष जोशी साहेब (ज्येष्ठ विचारवंत तथा पथ दर्शक) आदि मान्यवर अतिथी व्यासपिठावर विराजमान होते.
सर्व प्रातिनिधिक सत्कार मूर्तिंचा शाल, श्रीफळाने टाळ्यांच्या गजरात यथोचित सत्कार करणात आला. ऋण व्यक्त करण्यात आले. व्यास पिठावरिल सर्वांनीच समय सुचक व यथोचित मार्ग दर्शन करुन सभागृहातिल सर्वच ज्येष्ठांना मंत्रमुग्द केले.सुभेच्छा दिल्या. स्वा.से.डॉ.दादारावजी वैद्य(आर्य) सभागृहात नांदेड जिल्हा व शहर परिसरातील नांदेड जि.ज्ये.नागरिक संघ समन्वय समितिचे पदाधिकारी, सदस्य, तथा विविध क्षेत्रातील मान्यवर ज्येष्ठ नागरिकांची विषेश उपस्थिती होती.
प्रास्ताविक डॉ.हसराज वैद्य यांनी केले. प्रास्ताविकात ते म्हणाले की, प्रत्येक कुटूंबात ज्येष्ठ महिला पुरूष आहेत म्हणून तर घराला घरपण आहे. घरात ज्येष्ठ आहेत तर सर्व कांही ईष्ट होत राहते. ज्येष्ठ हे कुटूंब व समाज मनाचा आरसा आहेत. आचार, विचार व विहारांची अद्भूत अनुभूती संपन्न कुटूंब संहिता आहेत. म्हणूनतर जग सुरळीत चालत आहे. या अर्थानी ज्येष्ठ महिला-पुरूष्यांचा खरंतर रोजच दिवस साजरा करायला हवा.
एक दिवस ज्येष्ठ नागरिक दिवस तेही शासकिय खर्चातून, चाकोरी बद्ध पद्धतीने, शासनाचे परिपत्रक आहे म्हणून, कसेतरी उरकून घ्यायचे म्हणून, बातमी साठी फोटो काढून घेण्या पूरते नको. आमचे फार मोठ्या संख्येने आजूनही गरजू, दुर्लक्षित, उपेक्षित तथा वंचित शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी व अनोंदणीकृत कामगार ज्येष्ठ नागरिक जे मूलभूत सुख सुविधा व शहरा पासून कोसो दूर आणि अनभिज्ञ आहेत त्यांच्यासाठी शासन काही करणार आहे किंवा कसे हा यक्ष प्रण आजच्या दिनी चर्चिला जाणें व सरकार जर काही करत नसेल तर आपण शहरी, श्रीमंत, ज्ञानी तथा विचारवंत ज्येष्ठ नागरिक त्यांच्यासाठी कांही करणार आहोत की नाही? हाही विषय चर्चिला जाणे आजच्या दिनी आवश्यक आहे.
जर शासन त्यांच्यासाठी काहिच करत नसेल तर मग सर्वांनी मिळून शासनाला जागे करण्यासाठी रस्त्यावरही उतरावे लागणार आहे.हो किंवा नाही? असे विचारताच सभागृहातून एक सूराने हो चा नारा आला. तदनंतर सर्वानी सर्वांचा वाढदिवस उत्सव तथा सोहळा साजरा करण्यास्तव उत्सव मूर्तिंचा पुष्प वर्षाव करून तर उत्सव मूर्तींनीं सर्व उपस्थित ज्येष्ठांच्या वर्ती पुष्पवृष्टी करून एक विलोभनीय तथा नेत्रदिपक असा ज्येष्ठ नागरिक दिवस सोहळा साजरा करण्यात आला. शेवटी सामूहिकपणे सर्वांनी उभे राहून राष्ट्रगीत गायीले व भारत माता की जय ! वंदे मात्रम !! असे नारे देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.