डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाणचे पुरस्कार जाहीर
नांदेड। डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाण, नांदेड तर्फे दिले जाणारे राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले असून निवड समितीचे प्रमुख डॉ. पुंडलिक नामवाड, डॉ. मनोज राऊत, सुशीलकुमार भवरे यांनी माहिती दिली आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाण, नांदेड द्वारा एकदिवसीय बौद्ध धम्म परिषद सोनारी फाटा ता. हिमायतनगर जि. नांदेड येथे आयोजित करण्यात येते.
यावर्षी दि. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी धम्म परिषद होणार असून या बौद्ध धम्म परिषदेमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. त्यामधील पुरस्कार प्राप्त मान्यवर प्रा. विकास कदम, विठ्ठल दादा गायकवाड, इंजि. दयानंद शिंदे, विजय कटके, अमरदीप अचेमवार, गजानन सुर्यवंशी, अंगद खटाने, इंजि. शिवाजी कावळे, सोमा पाटील, मारोती चिभडे, सुनील मेटकर, समाधान सुर्वे, पी.पी. हनवते हिमायतनगरकर, शंकरदादा गर्दसवार, शंकरसिंह ठाकूर यांना देण्यात येणार आहे.
गेल्या सहा वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाणतर्फे हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे हे सातवे वर्षे असून एकदिवशीय बौद्ध धम्म परिषदेस हा पुरस्कार सोनारी फाटा ता. हिमायतनगर जि. नांदेड येथे खालील मान्यवरांच्या उपस्थितीत दिला जात आहे.
धम्म परिषदेचे उद्घाटक शिवश्री कामाजी पवार, राष्ट्रीय अध्यक्ष मराठा सेवा संघ, परिषद अध्यक्ष आ. माधवराव पाटील जवळगावकर, स्वागताध्यक्ष प्रा. मोहन मोरे, रफिकभाई सेठ हिमायतनगर, निमंत्रक कैलासभाऊ माने, जोगेंद्र नरवाडे कामारीकर, मार्गदर्शक डॉ. प्रमोद अंबाळकर, डॉ. पी.बी. नामवाड, मंगेशभाऊ कदम, इंजि. मिलींद गायकवाड, सुधाकर पाटील सोनारीकर आदींसह या एकदिवशीय बौद्ध धम्म परिषदेकरीता विशेष सहकार्य त्रिरत्नकुमार मा. भवरे, डॉ. मनोज राऊत, लक्ष्मणराव भवरे, शेख युनूस, शेख खयुम, शिवाजी डोखळे, नागोराव मेडेवाड, अविनाश कदम, किरण वाघमारे, जयभीम पाटील, डॉ. किशोर भगत, पांडूरंग मिरासे, मनोज शिंदे यांच्यासह या कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत.